अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराप्रकरणी मैत्रिणीसह 4 जणांवर गुन्हा

विरारमध्ये राहणाऱ्या एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तिच्या मैत्रिणीचा यात सहभाग असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे.

terrorist arrested

विरारमध्ये राहणाऱ्या एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तिच्या मैत्रिणीचा यात सहभाग असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. (case filed against 4 persons including girlfriend in case of gang rape of minor girl)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिचा मोबाईल खराब झाल्याने दुरुस्त करण्यासाठी जात असताना तिची मैत्रीण तिला भेटली. मैत्रिण तिला फिरायला जाण्याच्या बहाण्याने एका झोपडपट्टीच्या मागील ठिकाणी घेऊन गेली. त्यानंतर मैत्रिणीने तिच्या तीन मित्रांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले. तिघे जण त्याठिकाणी आल्यावर मैत्रिणीने पीडितेला एकाला तुझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे, नाही तर
तो बदनामी करेल अशी धमकी दिली. त्यानंतर काही कळायच्या आधीच दोन आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिसऱ्याने तिच्यासोबत अश्लिल कृत्य केले.

याप्रकरणी पीडितेच्या मैत्रिणीसह चार आरोपींविरोधात विरार पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय मात्र कागदावरच : जयंत पाटील