जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

Jitendra Awhad

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे.

रविवारी कळवा आणि ठाणे शहाराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत एका 40 वर्षीय महिलेने मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

या महिलेने दावा केला की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीलाला स्पर्ष करत बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधत तक्रार दाखल केली, याप्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.


राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर? रत्नागिरीत उदय सामंत यांच्यासोबत तासभर खलबतं