घरक्राइमकथित लव्ह जिहाद प्रकरण : बदनामी केल्याची मुलाच्या वडिलांची नवनीत राणांविरोधात तक्रार;...

कथित लव्ह जिहाद प्रकरण : बदनामी केल्याची मुलाच्या वडिलांची नवनीत राणांविरोधात तक्रार; गुन्हा दाखल

Subscribe

अमरावती – शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका 19 वर्षीय युवतीचे अपहरण करून हे प्रकरण लव्ह जिहादचा असल्याचा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि भाजप खासदार अनिल बोंडे भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला होता. मात्र, ही तरुणी सातारा येथे सापडली होती. यानंतर नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणावर त्या पीडित तरुणीने मला कोणीही पळवुन नेले नाही. मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे, असा धक्कादायक खुलासा माध्यमांशी बोलतांना केला होता. यामुळे आता लव्ह जिहादचा आरोप करणे खासदार नवनीत राणा यांना भोवले आहे. खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून राणा यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. कथित लव जिहाद प्रकरणात संबधीत मुलाला धमकावल्याचा आणि बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विशिष्ट समाजाची बदनामी केल्याचीही तक्रारीत नोंद आहे.

- Advertisement -

लिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप –

खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजपेठ सोलीस स्टेशनमध्ये राडा केला होता. मुलीला आत्ताच्या आता आमच्यासमोर हजर करा, म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घातला होता. यावेळी त्यांनी पोलिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत जवळपास 20 मिनिटे पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. दरम्यान राणा दाम्पत्यांनी पोलिसांवर गंभीर आरोपही यावेळी केले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -