26/11 सारख्या अतिरेकी हल्ल्याच्या धमकीचे मेसेज पाठवणारा व्यक्ती डोहामधील असल्याचा पोलिसांना संशय?

MUMBAI_POLICE

मुंबई – ट्रॅफिक पोलीस कंट्रोल रूमला आलेल्या एका मेसेजची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. पोलिस गुन्हे शाखा या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. ज्या अज्ञात व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हाट्सएप नंबरवर 26/11 सारख्या अतिरेकी हल्ल्याची धमकी दिली होती, त्याबाबत आता महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यांने ज्या नंबर वरून धमकीचा मेसेज आला आहे, तो पाकिस्तानचा नंबर असल्याचे सांगितले. पण ज्या आय .पी. एड्रेसचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून व्हाट्सएप मेसेज पाठविला गेला आहे, तो आय.पी. एड्रेस इतर देशातील आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारणे धमकी देण्याचे प्रकार याआधीही केलेल्या एका व्यक्तीनेच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. या व्यक्तीचे नाव अनिश असे असून तो डोहामधील असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. त्याने याआदीही अशाच प्रकारचा गुन्हा केला आहे.

गृहमंत्र्यांना रिपोर्ट –

सूत्रांनि दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अतिरेकी हल्ला करण्याची धमकी दिलेल्या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून असून या बाबतच्या चौकशीची प्रत्येक अपडेट घेत आहेत, असेही सांगितले जाते आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपलाही पत्र लिहिण्यात आले असून रियल टाईम आयपी एड्रेसची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. नेमक्या कोणत्या देशातून हा मेसेज करण्यात आला, हे यातून समोर येऊशकेल, असा विश्वास पोलीस यंत्रणेला आहे.

मोबाईल नंबर ट्रेसिंग –

धमकीचे मेसेजमध्ये एकूण 10 मोबाइल क्रमांकही पाठवले गेले होते. त्यापैकी चार मोबाइल क्रमांक फेब्रुवारीपासून बंद असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी टेलिकॉम कंपनी कडून संबंधित नंबर बाबत माहिती मागवली असून पुढील तपास सुरू आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) मदतीने करण्यात आलेल्या तपासात नमूद केलेल्या मोबाईल नंबरपैकी पाचपैकी चार नंबर हे यूपीतील बिजनौरचे, तर एक नंबर वसईचा असल्याचं समोर आले आहेत. या नंबरच्या मदतीने काहीचे लोकशनही ट्रेस करत मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र पुढील दिशेने वळवली असल्याचे त्यांनी सूत्रांनी सांगितले.