मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याचे सरकारचे ध्येय आहे. या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 हजार रूपये देण्यात येतात. परंतु, खोटी कागदपत्रे किंवा वार्षिक उत्पन्न असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाड्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
हेही वाचा : “शिवराजने पंचाला लाथ मारणे चुकीचे होते, त्याने खरेतर…”, चंद्रहार पाटील संतापले
एक्स अकाउंटवर ट्विट करत आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.”
“महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे,” असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी कसा अर्ज करावा?
खोटी कागदपत्रे देणे, वार्षिक उत्पन्न अधिक असताना सुद्धा लाभ घेतल्याप्रकरणी लाडक्या बहिणींवर कारवाई होत आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
हेही वाचा : ‘हेंद्र्या तुला बोललो का? तुझा उद्योग बघ ना, तू काय…’ जरांगे-पाटील वडेट्टीवारांवर संतापले