घरताज्या घडामोडीNilesh Rane : पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

Nilesh Rane : पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्या नंतर पोलिसांशी भाजपा कार्यकर्त्यांची झालेली बाचाबाची व बेकायदेशीर जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अन्य कारणे दाखवत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी जमाव करत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270, तसेच पोलिसांशी हुज्जत घातली या प्रकरणी 186, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा न्यायालयाच्या बाहेर जमलेली भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी व आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्या नंतर पोलिसांशी भाजपा कार्यकर्त्यांची झालेली बाचाबाची व बेकायदेशीर जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अन्य कारणे दाखवत पोलिसांकडून गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यातुन प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर काल झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामा प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता होती. याबाबतची प्रक्रिया देखील पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली होती. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी देखील निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याचे म्हटले होते. यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी हालचाली गतिमान होऊ लागल्या होत्या. जिल्हा न्यायालयाच्या बाहेर जमलेली भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी व आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्या नंतर पोलिसांशी भाजपा कार्यकर्त्यांची झालेली बाचाबाची व बेकायदेशीर जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अन्य कारणे दाखवत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा : भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंह यांची एसीबीकडून चौकशी, अनुप डांगेंनी केला होता आरोप

Nilesh Rane : पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -