Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र ठाण्याच्या माजी महिला महापौराने केला संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल; वाचा काय आहे...

ठाण्याच्या माजी महिला महापौराने केला संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल; वाचा काय आहे प्रकरण

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलगा खासदार श्रीकांत शिंदे याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला मला मारण्याची सुपारी दिल्याचे संजय राऊत यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते.

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात ठाण्यातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाण्याच्या माजी महिला महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दाखल केल्याने संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे बोलले जात आहे. ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारीनंतर संजय राऊत यांच्याविरोधात भा.द.वि कलम 211,135अ, 500,501,504,505(2) प्रमाणे गुन्हा दाखल केले आहेत. एका महिला माजी महापौराने हे गुन्हे दाखल केल्याने संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला मला मारण्याची सुपारी दिली असल्याचे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले होते. तसेच याप्रकरणी बुधवारी (ता. २२ फेब्रुवारी) ठाणे पोलिसांनी नाशिक येथे एक टीम पाठवू राऊतांचा जबाब देखील नोंदवून घेतला होता. “माझ्यावर राजा ठाकूर हल्ला करणार, तसंच शाई फेकणार अशी माहिती माझ्या विश्वासू मित्राने दिली होती. मी राजा ठाकूरला कधी भेटलेलो नाही, का त्याने कधी मला फोन केला नाही. मी त्याला कधी पाहिले नाही. काही लोकांमध्ये चर्चा झाली, ती चर्चा माझ्यापर्यंत आली म्हणून मी त्याबाबत पोलिसांना सांगितलं,’ असे संजय राऊत यांच्याकडून पोलिसांना सांगण्यात आलेले आहे.

हेही वाचा – संजय राऊत आरोप करत असलेला राजा ठाकूर नेमका कोण?

- Advertisement -

‘सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले धमकीचे आरोप हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तसंच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे, याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल,’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊत यांना लागवण्यात आला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी त्यांची सुपारी देण्यात आल्याचे पत्र पोलिसांना आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील दिले होते. पण आता माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारीनंतर राऊत यांच्यावर पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -