घरमहाराष्ट्रNEET UG EXAM 2021 : नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी नागपूरातून ५ विद्यार्थ्यांसह क्लास...

NEET UG EXAM 2021 : नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी नागपूरातून ५ विद्यार्थ्यांसह क्लास संचालकाला सीबीआयकडून अटक

Subscribe

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशभरात नीट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नागपूरात नीट परीक्षेदरम्यान मोठा घोटाळा झाल्याचं उघड झाल आहे. देशभरातील २०२ शहारांतील परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र नागपूरच्या परीक्षा केंद्रावर क्लास संचालकासह विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान घोटाळा केला होता. याचप्रकरणी मंगळवारी सीबीआयने नागपूरात छापेमारी केली. या छापेमारीनंतर आता पाच विद्यार्थ्यांसह क्लास संचालकाला सीबीआयने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. नीट ही परीक्षा देशातील सर्वात महत्वाच्या परीक्षेपैकी एक आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर मोठी सुरक्षा तैनात करण्यात येते. असे असतानाही नागपूर परीक्षा केंद्रवरील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सीबीआयने क्लासेसवर केली छापेमारी

नीट परीक्षेत बोगस विद्यार्थ्यांना बसवून घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयने नागपूरमध्ये छापेमारी केली. या परीक्षेवेळी बसलेल्या बोगस ५ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी परीक्षा केंद्रावर अधिकृत विद्यार्थ्याच्या जागी बोगस विद्यार्थी बसवल्याचं उघडं झालं होत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने नागपूरातील कोचिंग क्लासेसवर छापा टाकला आहे. या छापेमारीत काही कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागले आहे. नागपुरातील गणेशनगर, नंदनवन, आझमशाहा चौकातील क्लासेसवर छापे टाकण्यात आले होते.

- Advertisement -

सीबीआयनं सक्करदरा परिसरातील कोचिंग क्लासेसच्या संचालकांनाही अटक केल्याची माहिती समोर आले आहेत. १२ सप्टेंबरला झालेल्या नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याप्रकरणी अटक झाली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -