घरमहाराष्ट्रCBI क्लीनचिट अहवाल लीक प्रकरणात अनिल देशमुखांना धक्का, मुलगी आणि सुनेवर आरोपपत्र

CBI क्लीनचिट अहवाल लीक प्रकरणात अनिल देशमुखांना धक्का, मुलगी आणि सुनेवर आरोपपत्र

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने झटका दिला आहे. अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. 2021 मधील अहवाल माध्यमांमध्ये लिक केल्याप्रणकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात आरोपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये पूजा हिच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आहे. हा अहवाल मिळण्यासाठी पूजा देशमुख यांनी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागा यांच्या सोबत कट रचला. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाला देण्यासाठी लाच देण्याची योजना केली होती. हा अहवाल 29 ऑगस्ट 2021 रोजी माध्यमांमधून लीक झाला होता.

अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत विरोधात सीबीयाने मुंबई सत्र न्यायालयात आरोपत्र दाखल केले. अहवाल मिळवण्यासाठी अभिषेक तिवारी यांना अनिल देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनी कथित लाच दिल्याचा ठपका या आरोपपत्रामध्ये आहे. याप्रकरणाची चौकशी सीबीआय करत होती. पूजा, राहत यांच्यासोबत अनिल देशमुख यांचे नातेवाई विक्रांत देशमुख आणि सयाजीत वायल यांनाही आरोपी करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. परंतु ताब्यात घेतले नव्हते.

- Advertisement -

पूजा देशमुख यांच्या सांगण्यावरून सीबीआय तपासाविरोधात घोषण, व्हिडीओ कंटेट तयार करण्यासाठी छापील मजकूर आणि बॅनर तयार करण्यात आल्याचे चॅटद्वारे दिसून आले.

डागाला पुण्याला नेण्यासाठी पूजा देशमुख यांनी कुटुंबाची इनोव्हा गाडी आणि वाहनचालकाची व्यवस्था केली होती. तपासकामासाठी तिवारी तिथे उतरला होता. डागाने तिवारीकडून अहवालाचा मसुदा मिळवला. त्याबदल्यात तिवारी यांना ९५ हजार रुपयांचा आयफोन १२ प्रो देण्यात आला, असेही ग्रुप चॅटद्वारे समजले.

- Advertisement -

सीबीआयच्या अहवालाचे मुखपृष्ठ, प्रिंटिंग प्लॅन आणि साहित्य अनिल देशमुख यांचे समाजमाध्यमांचे काम पाहणारे वैभव तुमाने यांना पाठवण्यास सांगितले होते, जेणेकरून समांतर मीडिया ट्रायल चालवता येईल, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. याच ग्रुप चॅटमध्ये राहत देशमुख यांचाही समावेश.

 

नक्की काय आहे प्रकरण?

मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रूपयांची वसुली केल्याचा अरोप परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा देशमुखने लीक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी कोणता गुन्हा केला नाही. असा दावा करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणामध्ये अभिषेक तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डगा यांना अटक झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -