Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र PNB बँक घोटाळ्यातील एकमेव महिला आरोपीला जामीन मंजूर, ५ वर्षांनी तुरुंगातून सुटका 

PNB बँक घोटाळ्यातील एकमेव महिला आरोपीला जामीन मंजूर, ५ वर्षांनी तुरुंगातून सुटका 

Subscribe

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या एकमेव महिला आरोपीला अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे तब्बल 5 वर्षांनी ती महिला तुरुंगातून बाहेर येणार आहे. नीरव मोदी यांच्या कंपनीच्या माजी पदाधिकारी कविता मानकीकर असं या आरोपी महिलेचं नाव आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी त्यांचा जामीन मंजूर केला आहे. महिला असूनही रात्री 8 वाजल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी त्यांची अटक बेकायदा ठरवली होती, मात्र आवश्यक कायदेशीर प्रक्रियेद्वारे सीबीआयला पुन्हा त्यांना अटक करण्याची मुभा दिली. मात्र सीबीआयने त्यांना पुन्हा कधीच अटक केली नाही.

यावेळी 2018 मध्ये मानकीकर यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज केला, मात्र मानकीकर यांचा अर्ज 1 जून 2018 पासून प्रलंबित होता. ज्यावर अखेर पाच वर्षांनी निकाल लागला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी आपल्याला अद्याप केलेली नसून आपण खटल्याच्या सुनावणीवेळी नियमितपणे कोर्टात उपस्थित राहत असल्याचा दावा मानकीकर यांनी जामीन अर्जात केला होता, यावेळी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एम. मेंजोग यांनी त्यांनी जामिनाची मागणी मान्य केली. मात्र जून 2018 पासून त्यांचा जामीन अर्ज प्रलंबित होता. यादरम्यान त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने मानकीकर यांची अटक बेकायदा ठरवत सीबीआयला आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्यांना पुन्हा अटकेची मुभा दिली, मात्र सीबीआयने त्यांना पुन्हा अटक केली नाही. यावेळी मानकीकर नियमितपणे सुनावणीसाठी उपस्थित असतात. त्यामुळे या प्रकरणाच्या या टप्प्यावर त्यांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळता येणार नाही असे नमूद करत न्यायालयाने कविता मानकीकर यांना जामीन अखेर मंजूर केला आहे.

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून मेहूल चोक्सी आणि या घोटाळ्यातील प्रमुख आरोप नीरव मोदी याने कुटुंबियांसह भारतातून पयालन केले. सीबीआयने याप्रकरणी जानेवारी 2018 मध्ये पहिला गुन्हा दाखल केला. यानंतर ईडी, आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणांनी नीरव मोदी, मेहूल चोक्सी आणि पीएनसी बँकेचे अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.


तुर्की, सीरियात भूकंपामुळे वाताहत; 3400 हून अधिकांचा मृत्यू, 3500 घरं उद्ध्वस्त

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -