अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल, देशमुख मुख्य, तर संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे सहआरोपी

१०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने नुकताच आपल्याला माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. नुकत्याच झालेल्या सुनावणीत सीबीआयने त्याचा अर्ज स्वीकारला आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात होते.

court reject anil deshmukh home food request and says eat jail food later we think

तब्बल १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गुरुवारी त्यांच्याविरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी एकूण ५९ पानांचे आरोपपत्र सीबीआयकडून दाखल करण्यात आले असून देशमुख यांना मुख्य आरोपी दाखवण्यात आले आहे. तसेच देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना सहआरोपी दाखवण्यात आले आहे.

१०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने नुकताच आपल्याला माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. नुकत्याच झालेल्या सुनावणीत सीबीआयने त्याचा अर्ज स्वीकारला आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता सीबीआयनेही न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याने देशमुख यांचा पाय याप्रकरणी आणखीन खोलात गेल्याचे बोलले जात आहे.

२० मार्च २०२१ रोजी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईतील हॉटेल्स चालकांकडून १०० कोटी वसूल करण्याचे आदेश अनिल देशमुखांनी पोलीस अधिकार्‍यांना दिले असल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने प्राथमिक तपास केला. या तपासादरम्यान देशमुखांच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरण आणि काळा पैसा परदेशात पाठवल्याप्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. ईडीनेही देशमुख यांच्याविरोधात १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.