CBIकडून संजय पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, घरावर छापे

शनल स्टॉक एक्सचेंजमधील (NSE) सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज सकाळपासून देशभरात १८ ठिकाणी छापे टाकले आहेत.

sanjay pande

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील (NSE) सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज सकाळपासून देशभरात १८ ठिकाणी छापे टाकले आहेत. यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्यावर घरावर छापा टाकला आहे. या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती. यासंदर्भात ईडीने देखील संजय पांडे यांची चौकशी केली असून त्यासंदर्भात संजय पांडे यांच्याव्यतिरिक्त एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध एनएसई अधिकाऱ्यांचे फोन टॅप करणे आणि इतर अनियमितता केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे दाखल –

३० जूनला संजय पांडे सेवानिवृत्त झाल्यानंतर ईडीने त्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. आता सीबीआयने त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल केले आहेत. संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांनी एक ऑडिट कंपनी स्थापन केली होती. २०१८ पासून सीबीआय एनएसई स्कॅमचा तपास करत आहे. २००९ ते २०१७ या काळात शेअर मार्केटमधील कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर ईडीने संजय पांडे यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत.

काय आहे प्रकरण –

आयसेक सर्व्हिसेस प्रा. ली. ही सॅाफ्टवेअरशी संबंधित कंपनी २००१ मध्ये पांडे यांनी ते सेवेत नसताना स्थापन केली होती. सेवेत रुजू झालनंतर 2006 मध्ये पांडे यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. या कंपनीत पांडे यांचे कुटुंबीय संचालक आहेत. झावबा कॉर्पवर उपलब्ध माहितीवरून संतोष पांडे हे 2003 पासून या कंपनीचे पूर्णवेळ संचालक आहेत. या कंपनीवर एनएसईने 2010 ते 2015 या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सॉफ्टवेअरसंबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपवली होती. सर्व्हरमध्ये फेरफार होऊनही त्याबाबतची कल्पना लेखापरीक्षण कंपनीला कशी मिळाली नाही की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातच संजय पांडेंची सध्या चौकशी सुरू आहे.