घरमहाराष्ट्रCBI कडून मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची सहा तास चौकशी; आता पुन्हा...

CBI कडून मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची सहा तास चौकशी; आता पुन्हा चौकशी होणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाने परमबीर सिंग यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी त्यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयनं मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संजय पांडेंची जवळपास सहा तास चौकशी केलीय. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फोन करून देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून धमकावल्याचा आरोप आहे. त्याच प्रकरणात ही चौकशी करण्यात आलीय.

गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गृहरक्षक दलात बदली करण्यात आली होती, त्यानंतर परमबीर सिंग यांनी मार्चमध्ये तत्कालीन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता, जेव्हा त्यांना अँटेलिया स्फोटक सामग्रीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा त्यांचा गंभीर आरोप होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाने परमबीर सिंग यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी त्यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

- Advertisement -

विशेष म्हणजे परमबीर सिंग यांची महाराष्ट्र होमगार्ड प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर सहा महिने ते हजर झाले नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव आपल्याला 29 ऑगस्टपर्यंत सुट्टी देण्यात आली होती, अशी त्यांची विनंती ठाकरे सरकारने मान्य केली होती. मात्र त्यानंतरही आपण ड्युटीवर रुजू होत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अनियमितता आणि त्रुटींबद्दल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 12 नोव्हेंबरला येथील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यादिवशी निलंबनाचा आदेश मंजूर करण्यात आला आणि परमबीर सिंह यांना निलंबित करण्यात आले. दुसरीकडे परमबीर सिंग यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून, परमबीर सिंह यांचीसुद्धा चौकशी सुरू आहे.

त्यानंतर परमबीर सिंहांनी आपल्याविरुद्धचा तपास मागे घ्यावा, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडेंचे संभाषण उघड केले होते. ज्यामध्ये कथितपणे संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांना फोन करून त्यांचे पत्र मागे घेण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल केले जातील, असे म्हटले.

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केल्यानंतर ते प्रकरण कोर्टात गेले होते. संजय पांडे आणि परमबीर सिंह यांच्यात झालेल्या संभाषणातून महाराष्ट्र सरकार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय यंत्रणांच्या तपासापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. केंद्रीय यंत्रणांमार्फत सुरू असलेला तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग करावा, अशी विनंती करणारी याचिका महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल केली असता सीबीआयने हे उत्तर दिले होते.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -