घरमहाराष्ट्रअनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरण : नगर, पुणे, मुंबईत १२ ठिकाणी...

अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरण : नगर, पुणे, मुंबईत १२ ठिकाणी CBI चे छापे

Subscribe

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध खंडणी व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने महाराष्ट्रातील १२ ठिकाणी छापे घातले. मंगळवारी आणि बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत सीबीआय अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सांगली आणि अहमदनगर या ठिकाणी छापे घातले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि अहमदनगर येथील सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याशी संबंधित असलेल्या जागेचा या प्रकरणातील संशयित मध्यस्थांकडून शोध घेण्यात आला.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला होता. त्या पत्रात एसीपी संजय पाटील व उपायुक्त राजू भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख होता. भुजबळ यांच्या  संगमनेर येथील घरावर ईडी अधिकाऱ्यांनी छापा घातला. सकाळी साडेनऊ ते साडेबारा अशी तीन तास चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान डीसीपी राजू भुजबळ हे Social Service branch चे प्रभारी असताना एसीपी संजय पाटील हे या युनिटशी जोडले गेले होते. या प्रकरणी federal probe agency आज संशयितांना अटक करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपात सहायक निरीक्षक सचिन वाझेंसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याही नावाचा उल्लेख आहे. भुजबळ मूळचे संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गावातील आहेत. त्यामुळे मंगळवारी ईडीच्या पथकाने तेथे जाऊन सुमारे तीन तास कसून चौकशी केली. पोलीस उपायुक्त भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह मुंबईतच राहतात. मात्र त्यांची शेतजमीन व अन्य नातेवाईक गावीच आहेत. त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांच्या गावाकडील घर आणि नातेवाईकांची माहिती मिळाल्याने पथकाने त्यांच्या गावी जाऊन नातेवाईकांचे जवाब घेतले. भुजबळ यांच्या येथील नातेवाईकांचे जवाब नोंदवून घेतले. या चौकशीतून नेमके काय समोर आले आहे, याबाबत अद्याप निश्‍चित कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -