घरताज्या घडामोडीअविनाश भोसलेंना CBI कोर्टात हजर करण्यात येणार, सीबीआय कोठडीची मागणी करणार

अविनाश भोसलेंना CBI कोर्टात हजर करण्यात येणार, सीबीआय कोठडीची मागणी करणार

Subscribe

ईडीने याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जाते.

महाराष्ट्रातील उद्योजक अविनाश भोसले (Builder_Avinash_Bhosle) यांना सीबीआयने अटक (CBI_Arrested) केली आहे. डीएचएफल (DHFL Scam) आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान त्यांना चौकशीसाठी बोलवल्यानंतर उशीरा अटक करण्यात आले आहे. भोसले यांना सीबीआय कार्यालयात ठेवण्यात आले आहे. यापूर्वीसुद्धा अविनाश भोसले यांची आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांशी भोसले यांचे जवळचे संबंध असल्यामुळे अनेक नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

उद्योजक अविनाश भोसले यांना येस बॅंक आणि डीएचएफएल बॅंक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी यापूर्वी अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. तर काही वेळा भोसले पिता-पुत्रांनी ईडीच्या समन्सला केराची टोपली दाखवली होती. सीबीआय आणि ईडी गैरव्यवहाराप्रकरणी तपास करत आहे.

- Advertisement -

आयबीच्या परवानगीविना विदेशी बँकेतील खात्यात ५०० कोटी कसे जमा केले, असा संशय ईडीला आहे. याचपार्श्वभूमीवर ईडीने अधिक तपास सुरू केला आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात तब्बल १० दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. फेमा कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे तर यापूर्वी आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापेमारी केली होती. सध्या भोसले सीबीआयच्या ताब्यात असून सीबीआय कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे.

ईडीने याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जाते. भोसले कुटुंबीयांची पुणे, नागपूर, गोवा परिसरात तारांकित हॉटेल्स आहेत. दरम्यान त्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयकडून कोठडीची मागणी करण्यात येऊ शकते.

- Advertisement -

कोण आहेत अविनाश भोसले?

रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे. त्यानंतर त्यांनी कृष्णा खोरे महामंडळातील कामांचे ठेके मिळविले. सर्वपक्षीय सलगी असलेल्या भोसले यांनी त्यानंतर मोठी व्यवसायवृद्धी केली. कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.


हेही वाचा : Avinash Bhosale : रिक्षाचालक ते रिअल इस्टेट किंग, कोण आहेत अविनाश भोसले?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -