CBSE Board Exams 2022 : दहावी आणि बारावी CBSE बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, एका वर्गात बसणार १८ विद्यार्थी

mhada and mpsc exam will be held on same day student
CBSE Board Exams 2022 : दहावी आणि बारावी CBSE बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, एका वर्गात बसणार १८ विद्यार्थी

आजपासून दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. 10वी आणि 12वी टर्म 2 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रत्येक वर्गात १८ विद्यार्थ्यांना बसवण्यात येणार आहे. तसेच CBSE वेबिनारनुसार, जरी एखादा विद्यार्थी 10वी किंवा 12वीच्या टर्म 2 च्या परीक्षेत बसला नाही, तरी त्याचा निकाल टर्म 1 मधील गुण आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे घोषित केला जाईल.

CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वी टर्म 2 परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक माहिती आहे. परीक्षा देण्यास अडथळा आला असेल तर पहिल्या टर्मच्या मूल्यांकनाच्या आधारे निकाल लावण्यात येणार आहे. इयत्ता 10 वी किंवा इयत्ता 12वीचे विद्यार्थी जे टर्म 1 च्या परीक्षेला बसले नाहीत किंवा टर्म 2 च्या परीक्षेला बसले नाहीत, त्यांना CBSE द्वारे टर्म 2 च्या परीक्षेत बसू दिले जाणार नाही. नंतर होणाऱ्या कंपार्टमेंट परीक्षेला बसता येईल. इयत्ता 10 वी किंवा इयत्ता 12वीचे विद्यार्थी जे टर्म 1 च्या परीक्षेला बसले नाहीत किंवा टर्म 2 च्या परीक्षेला बसले नाहीत, त्यांना CBSE द्वारे टर्म 2 च्या परीक्षेत बसू दिले जाणार नाही. नंतर होणाऱ्या कंपार्टमेंट परीक्षेला बसता येईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाच्या भीतीमुळे देशातील अनेक दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी टर्म 1 ची परीक्षा दिली नव्हती. पुन्हा कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सीबीएसई बोर्डाची टर्म 2 परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, CBSE टर्म 2 परीक्षा 2022 संदर्भात दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांमधील तणाव दूर होण्याची शक्यता आहे.

मुख्य मार्गदर्शक तत्त्वे –

उमेदवारांना निळ्या किंवा काळ्या शाईने किंवा जेल पेनने परीक्षा द्यावी लागेल.
केवळ मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षा हॉलमध्ये अन्नपदार्थ नेण्याची परवानगी असेल.
उमेदवारांना स्वतःची पारदर्शक पाण्याची बाटली, हातमोजे आणि सॅनिटायझर आणावे.
सामाजिक अंतर नेहमीच पाळावे लागेल.
कोविडपासून बचाव करण्यासाठी केंद्रीय अधीक्षकांना सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
परीक्षार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना मास्क घालावे लागणार आहे.
परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग आणि स्वच्छता केल्यानंतरच विद्यार्थ्यांना आत प्रवेश दिला जाईल.
परीक्षा केंद्रावर वेळेच्या अर्धातास लवकर पोहोचावे. दहा वाजल्यानंतर कोणाला प्रवेश दिला जाणार नाही.


हेही वाचा : India Ratings : घराचं स्वप्न भंगलं! घर खरेदीच्या किमतीत 12 टक्क्यांची वाढ