नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्यामध्ये दहावीची परीक्षा 18 मार्चला संपणार आहे तर, बारावीची परीक्षा 4 एप्रिलला संपणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या वर्गातील विद्यार्थ्यांचे पेपर हे सकाळी 10.30 वाजता सुरू होतील आणि दुपारी 01.30 वाजता संपणार आहेत. यंदा सीबीएसईने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 दिवस अगोदरच जाहीर केल्याचे समोर आले आहे. (Central Board of secondary education announced datesheet for class 10 and 12 board exams.)
हेही वाचा : DCM Devendra Fadanvis : लाडकी बहीण योजनेचा प्रभाव किती? फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक cbse.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. त्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपले परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाकडून या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार असून दहावीची परीक्षा 18 मार्चला संपणार आहे तर त्यानंतर बारावीची परीक्षा 4 एप्रिलाला संपणार आहे. या वर्गातील विद्यार्थ्यांना कित्येक दिवसांपासून वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात.
हेही वाचा : Odisha Crime : ओदिशामध्ये आदिवासी तरुणीला मारहाण; त्यांनतर तिच्या…. नेमकी घटना काय?
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक
इंग्रजी कम्युनिकेटिव / इंग्रजी भाषा आणि साहित्य – 15 फेब्रुवारी 2025
विज्ञान – 20 फेब्रुवारी 2025
फ्रेंच / संस्कृत – 22 फेब्रुवारी 2025
सामाजिक शास्त्र – 25 फेब्रुवारी 2025
हिंदी कोर्स ‘अ’ / ‘ब’- 28 फेब्रुवारी 2025
गणित – 10 मार्च, 2025
माहिती तंत्रज्ञान – 18 मार्च 2025
बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक
शारीरिक शिक्षण – 15 फेब्रुवारी 2025
भौतिकशास्त्र – 21 फेब्रुवारी 2025
व्यवसाय शिक्षण – 22 फेब्रुवारी 2025
भूगोल – 24 फेब्रुवारी 2025
रसायनशास्त्र – 27 फेब्रुवारी 2025
गणित – मानक / उपयोजित गणित – 8 मार्च 2025
इंग्रजी वैकल्पिक / इंग्रजी आवश्यक – 11 मार्च 2025
अर्थशास्त्र – 19 मार्च 2025
राज्यशास्त्र – 22 मार्च 2025
जीवशास्त्र – 25 मार्च 2025
लेखांकन – 26 मार्च 2025
इतिहास – 1 अप्रैल 2025
मानसशास्त्र – 4 अप्रैल 2025
दहावीच्या परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या परीक्षेने होणार आहे तर शेवटचा विषय तंत्रज्ञान हा असणार आहे. यांची परीक्षा 18 मार्चला संपणार आहे. तर बारावीच्या परीक्षेची सुरुवात शारीरिक शिक्षण विषयाने होणार असून शेवटचा पेपर 4 एप्रिलला मानसशास्त्र असणार आहे.
Edited By Komal Pawar Govalkar