Homeमहाराष्ट्रSSC vs CBSE : शासकीय शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न आणणार, पण दोन्हीमध्ये फरक...

SSC vs CBSE : शासकीय शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न आणणार, पण दोन्हीमध्ये फरक काय?

Subscribe

मुंबई : नुकतेच महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्नचा विचार करत असल्याचे सांगितले. पुढील टप्प्यात सीबीएसई पॅटर्नच्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या आपण शाळांमध्ये घेऊ. सन 2026-27 मध्ये सीबीएसई पॅटर्नचा वापर होणार आहे. सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यामध्ये राज्याप्रमाणे काही बदल करणे आवश्यक असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. पण यामुळे आता राज्य सरकार हे एसएससी बोर्ड ऐवजी सीबीएसई बोर्डमध्ये शिक्षण घ्या, असे म्हणत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पण, सीबीएसई आणि एसएससी या दोन्ही बोर्डमध्ये फरक काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (CBSE pattern for schools in state and difference between CBSE and SSC)

हेही वाचा : Congress News : काँग्रेसला मोठा धक्का बसणार! बड्या नेत्या ‘हाता’ला रामराम ठोकण्याच्या तयारीत…

देशभरात एसएससी आणि सीबीएसई हे दोनही बोर्ड अत्यंत लोकप्रिय आहेत. अनेक शाळा या दोनही बोर्डची सलग्न आहेत. सीबीएसई बोर्ड हे केंद्रीय बोर्ड असून ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. तर, एसएससी बोर्ड हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. म्हणजेच, दोन्ही बोर्डांचा अभ्यासक्रम आणि कोर्सेस दोन्ही वेगवेगळे आहेत. कारण सीबीएसईचा अभ्यासक्रम एनसीईआरटी तयार करतो. तर, एसएससी अभ्यासक्रम हा राज्य सरकारचे शिक्षण विभाग तयार करते. सीबीएसई एक राष्ट्रीय बोर्ड असल्याने ते शिक्षण आणि संवादाचे माध्यम म्हणून इंग्रजीला प्राधान्य देते. तर, एसएससी हे राज्य व्यवस्थापित बोर्ड असल्याने ते मराठी, हिंदी, कन्नड इत्यादी प्रादेशिक भाषांना प्राधान्य देते. या शाळांमध्ये इंग्रजी पहिली किंवा दुसरी भाषा म्हणून शिकवली जाते.

सीबीएसईच्या बहुतेक शाळा खासगी असून त्यामुळे सीबीएसई बोर्डातील शिक्षणाचा एकूण खर्च हा एसएससीपेक्षा अधिक असतो. एसएससी ही राज्य-व्यवस्थापित असल्याने बहुतेक सार्वजनिक शाळांमध्ये तसेच खासगी शाळांमध्येही ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यामुळे त्याचे शुल्क कमी असते. सीबीएसई बोर्डमध्ये संपूर्ण देशभरात एकच पॅटर्न असतो. त्यामुळे आंतरराज्यीय शाळा बदलणे हे विद्यार्थ्यांसाठी अवघड जात नाही. तर तेच एसएससीचा अभ्यासक्रम हा राज्य-विशिष्ट असल्याने आंतरराज्यीय शाळा बदलणे फारसे शक्य होत नाही. तसेच, या दोनही बोर्डमध्ये विषयांच्या श्रेणीचा फरक आहे. सीबीएसई हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने विषयांवर मर्यादा येते. पण, एसएससीमध्ये अनेक विषयांचा समावेश होतो, ज्यामध्ये अनेक प्रादेशिक भाषादेखील येतात. तेच, सीबीएसई बोर्ड हे अनेक राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा नियंत्रित करणारे बोर्ड असल्याने मुलांना परीक्षांसाठी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. तेच, एसएससी बोर्डमध्ये समग्र शैक्षणिक ज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करते.