घरमहाराष्ट्रदिवाळी साजरी करा, पण पर्यावरणाचे नियम पाळून; फडणवीसांचं जनतेला आवाहन

दिवाळी साजरी करा, पण पर्यावरणाचे नियम पाळून; फडणवीसांचं जनतेला आवाहन

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, त्यांनी जनतेला पर्यावरणाचे नियम पाळून दिवाळी साजरी करण्याचं आवाहनही यावेळी केलं आहे.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, त्यांनी जनतेला पर्यावरणाचे नियम पाळून दिवाळी साजरी करण्याचं आवाहनही यावेळी केलं आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी ते कोळीवाड्यात गेले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.( Celebrate Diwali 2023 but with environmental rules Devendra Fadnavis appeal to the public)

फडणवीस  म्हणाले की,  ही दिवाळी आपल्या  सर्वांसाठी सुखा-समाधानाची, आरोग्य-ऐश्वर्याची जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसंच येणार नवीन वर्ष हे आपल्या देशाकरता आणि महाराष्ट्राकरता अतिशय उत्तम असावं. तसंच,  दीन-दलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणार अशाप्रकारचं ठरावं अशी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

भाजपची सर्वसामान्य जनतेसोबत दिवाळी साजरी 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंदाची दिवाळी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन सर्वसामान्य लोकांसोबत, गरिबांसोबत आपण साजरी करायला हवी असं सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही येथे आलो आहोत.  मला अतिशय आनंद आहे, की राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्त्वात आम्ही कुलाब्यातील सर्वात जुन्या कोळीवाड्यामध्ये दिवाळी साजरी केली आहे आणि लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे. तसंच लोकांचेच आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही काम करु शकतो.

मुंब्र्यात शाखेवरून झालेल्या वादावर विचारलं असता, फडणवीसांना उत्तर देणं टाळलं. त्यांनी म्हटलं की कालचा दिवस संपला आता नवीन दिवस सुरू झाला. आज दिवाळीवर बोलूया.

- Advertisement -

फडणवीसांचं जनतेला  आवाहन 

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांबाबत दिलेल्या निर्देशांचं पालन आपण करत आहोत. दिवाळी ही उत्साहानेच साजरी करा, पण सोबतच पर्यावरणाचे नियम पाळून. ज्याप्रमाणे आज प्रदूषण वाढत आहे त्यामुळे रोगराई वाढली आहे. त्यामुळे माझं सर्वांना आवाहन आहे की कमीत कमी प्रदूषण होईल, अशा पद्धतीने दिवाळी साजरी करा. दिवे लावा, प्रकाश करा, फटाके फोडा पण ते कमी प्रदूषण निर्माण करणारे असू द्या, असं फडणवीसांनी जनतेला आवाहन केलं आहे.

(हेही वाचा: …हा माज सत्तेचा, मुंब्रा शिवसेना शाखेवरून जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -