घरताज्या घडामोडीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पध्दतीने साजरी करा, राज्य सरकारची नियमावली जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पध्दतीने साजरी करा, राज्य सरकारची नियमावली जाहीर

Subscribe

प्रभात फेरी, मिरवणूक, इतर कार्यक्रमांना बंदी

राज्यात कोविड- १९ च्या दुस-या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता या वर्षी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. राज्यावरील कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये धार्मिक तसेच इतर कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारद्वारे करण्यात आले आहे. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त सर्व नागरिकांनी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्याचे आव्हान करत राज्य सरकारद्वारे जयंती साजरी करण्यासाठी जयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाही केली आहे.

खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत

दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमुन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात, परंतु यावर्षी कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी ७.०० वाजेपासून संध्याकाळी ८.०० वाजण्यापुर्वी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

या वर्षी कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रेली, मिरवणुका यावेळी जयंती निमित्ताने काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी ५ पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोडल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सनिटायझर इत्यादी) पालन करून परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात यावी .

तथापि, चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देणेसाठी राज्यपाल, मुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित रहाणार असल्याने सदर कार्यक्रमासाठी ५० पर्यंत व्यक्‍ती उपस्थित राहू शकतील. तसेच दिक्षाभूमी नागपूर येथील कार्यक्रमासाठी ५० पर्यंत व्यक्‍ती उपस्थित राहू शकतील.

- Advertisement -

‘कोविड-१९ विषाणुच्या पार्श्वभूमीवर चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने व दादर, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंती निमित्त चैत्यभुमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे न येता घरातुनच परमपुज्य भारतरत्न

दरवर्षी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाटय इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कव्दारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्‍तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोडल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

राज्यातील कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असे आवाहन राज्य सरकारद्वारे सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -