कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्राची महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांसाठी नव्या सूचना

दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून आता नवे पंचसूत्री धोरण अवंलबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Center's new advisory for 'these' states including Maharashtra due to increasing outbreak of Covid

गेल्या दोन दिवसांत राज्यात कोरोना आणि H3N2 या नव्या विषाणूचे रूग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाने राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढल्याने बहुतांश नागरिकांनी पुन्हा एकदा मास्क वापरण्यास सुरूवात केली आहे. तर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्यात मास्क सक्ती करण्यात येणार असल्याचे सुद्घा संकेत दिले आहेत. तर आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्राने सुद्धा पंचसूत्री धोरण राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासह अन्य पाच राज्यांसाठी नव्या सूचना जाहीर केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांना पंचसूत्रीचे धोरणं अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये टेस्ट, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि व्हॅक्सिनेशन अशा पद्धतीनं धोरणं अवलंबण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तसेच, या पाच राज्यांमध्ये कोविडच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. या राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं केंद्रानं याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

H3N2 विषाणूबाबत मंत्री तानाजी सावंत यांनी काल (ता. १५ मार्च) विधानसभेच्या सभागृहात माहिती दिली. त्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी निर्बंधांबाबत विचारणा केली. मास्क आता संयुक्तिक झाला आहे, असे दिल्ली एम्सचे संचालक गुलेरीया यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तशा काही सुचना आल्या आहेत का?, याची काही मार्गदर्शक सुचना जारी केली जाणार आहे का?. यासाठी समिती नेमली आहे का?. अशी विचारणा करत याचा खुलासा करण्याची मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यावर मंत्री तानाजी सावंत यांनी वरील उत्तर दिले.

हेही वाचा – मोदी आणि अदानींच्या ऑस्ट्रेलियातील बैठकीचे रहस्य काय?; राहुल गांधींचा सवाल

दरम्यान, भारतात H3N2 इन्फ्लूएंजाचा विळखा वाढतोय. राज्यातही या रोगाची साथ पसरली असून सर्दी आणि खोकल्यामुळे अनेकजण हैराण आहेत. या विषाणूची लक्षणेही कोरोनासारखी असल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एमबीबीएसचं शिक्षण घेणारा एक विद्यार्थी बाहेर फिरायला गेला होता. तिथून आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. तसेच, तो H3N2 बाधित असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात ७५ वर्षीय व्यक्तीचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात H3N2 मुळे आतापर्यंत २ मृत्यू झाले असून संपूर्ण देशभरात या विषाणूमुळे चार जणांचा जीव गेला आहे.