घरक्राइमइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तीन लाचखोर अधिकाऱ्यांना अटक

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तीन लाचखोर अधिकाऱ्यांना अटक

Subscribe

सीबीआयनं प्रत्येकी १ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून एकाच दिवशी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ३ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. याप्रकरणात नागपुरातील २ आणि गोंदियाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेडच्या ३ अधिकाऱ्यांना अटक केली. सीबीआयनं प्रत्येकी १ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून एकाच दिवशी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ३ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. याप्रकरणात नागपुरातील २ आणि गोंदियाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील खाडीपार, गोरेगाव येथील मिरा पेट्रोल पंप मालकाला इंडियन ऑईलचे विक्री अधिकारी सुनील गोलार यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. पंपावर आवश्यक साठा उपलब्ध करून देण्यासाठी हे पैसे मागण्यात आल्याचं समजतं. पंप संचालकांनी सीबीआयचे वरिष्ठ अधीषक सलीम खान यांच्याकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा सुरू असतानाच दुसरीही अशीच एक तक्रार आकाश अशोक चौधरी यांच्याकडून सीबीआयला मिळाली.

- Advertisement -

या दोन्ही तक्रारी खऱ्या असल्याची खात्री करून घेतल्यानंतर अधीषक सलिम खान यांनी गुरुवारी रात्री या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. तसंच, सुनील गोलार आणि नागपुरातील इंडियन ऑईलचे महाव्यवस्थापक एन.पी. रोडगे आणि मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले या दोघांना अटक केली. दरम्यान, नागपूर आणि गोंदियात सीबीआयने शुक्रवारी केलेल्या या कारवाईमुळं आयओसीएल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या चौकशीदरम्यान इंडियन ऑईलचे आरोपी अधिकारी लाच घेताना सांकेतिक भाषेचा (कोडवर्ड) वापर करत असल्याचं समोर आलं. रोडगे हे ए-वन नावाने तर नंदले ए-टू नावाने वावरत होते. लाच घेऊन गेलेल्या व्यक्तीला रोडगेने ती रक्कम ए-टू कडे देण्यास सांगितले होते. त्यांच्यातील हा सर्व सांकेतिक व्यवहार सीबीआयने आधिच रेकॉर्ड केला होता. त्यामुळं पोलिसांना लाच स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांना सहज पकडलं.

- Advertisement -

गोंदियात गोलरला अटक केल्यानंतर नागपुरात नंदले आणि रोडगेला जेरबंद करण्यात आले. या तिघांच्या घरी आणि कार्यालयत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान या तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले.


हेही वाचा – अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -