राज्यातील ‘या’ तीन सरकारी सौर प्रकल्पांना मिळणार 130 कोटी रुपयांचे अर्थसाह्य

राज्य सरकारी ऊर्जा कंपन्यांमध्ये तीन वर्षांत 50 हजार कोटी रुपये गुंतवणूक होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली होती. त्या घोषणेनंतर 24 तासांतच ऊर्जा विभागाने या मदतीचा शासनादेश काढला. त्यानुसार, आता राज्यातील तीन सरकारी सौर प्रकल्पांना 130 कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे.

राज्य सरकारी ऊर्जा कंपन्यांमध्ये तीन वर्षांत 50 हजार कोटी रुपये गुंतवणूक होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली होती. त्या घोषणेनंतर 24 तासांतच ऊर्जा विभागाने या मदतीचा शासनादेश काढला. त्यानुसार, आता राज्यातील तीन सरकारी सौर प्रकल्पांना 130 कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे. शिवाय, महापारेषणच्या 7 उपकेंद्रांसाठी 120 कोटी रुपयांची मदत होत आहे. त्यामुळे एकूण 250 कोटी रुपयांच्या मदतीसंबंधीचा शासनादेश सरकारने काढला आहे. (Central Government 130 Crore To Three Government Solar Projects In The State)

राज्य सरकारच्या शासनादेशात चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणावरील महानिर्मिती कंपनीच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही मदत केंद्र सरकारी योजनेतील माफक स्वरूपाची असली तरी गुरुवारच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ती महत्त्वाची ठरली आहे.

राज्यांना भांडवली खर्चासाठी केंद्र सरकारकडून विशेष साह्य योजनेंतर्गत निधी दिला जातो. या योजनेंतर्गत ऊर्जा विभागाला 500 कोटी रुपयांचे वित्तसाह्य होणार आहे. त्यातील 250 कोटी रुपयांच्या वित्तसाह्याचा आदेश सरकारने काढला असून, त्या अंतर्गत ऊर्जा विभागातील महानिर्मिती व महापारेषण या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून आलेल्या 250 कोटी रुपयांच्या निधीचा हा पहिला टप्पा आहे. 250 कोटी रुपयांच्या कामाची पावती सादर केल्यानंतरच केंद्र सरकार उर्वरीत 250 कोटी रुपयांचा हप्ता ऊर्जा विभागासाठी मोकळा करणार आहे. बिनव्याजी कर्जरूपात केंद्र सरकारी योजनेतील ही मदत आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री व दोंडाईचा, तर महापारेषण कंपनीच्या उलवे, मानकोली, पावणे, तीर्थपुरी, पनवेल, शहा व धानोरा येथील उपकेंद्रांचा समावेश आहे. यापैकी सौर ऊर्जा प्रकल्प नवे आहेत, तर महापारेषणच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

‘असे’ मिळणार अर्थसाह्य

 • इरई धरण सौर ऊर्जा नवीन 30 महानिर्मिती
 • प्रकल्पाचे नाव स्वरूप निधी (कोटी रु.) यंत्रणा
 • साक्री सौर ऊर्जा नवीन 30 महानिर्मिती
 • दोंडाईचा सौर ऊर्जा नवीन 70 महानिर्मिती
 • उलवे नोड उपकेंद्र चालू 27.39 महापारेषण
 • पावणे उपकेंद्र चालू 21.57 महापारेषण
 • मानकोली उपकेंद्र चालू 16.04 महापारेषण
 • तीर्थपुरी उपकेंद्र नवीन 8.93 महापारेषण
 • पनवेल उपकेंद्र चालू 25 महापारेषण
 • शहा उपकेंद्र चालू 12.29 महापारेषण
 • धानोरा उपकेंद्र चालू 8.78 महापारेषण

हेही वाचा – “मला धमक्या देऊ नका… नादालाही लागू नका… महागात पडेल”, राऊतांचा राणेंवर पलटवार