Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मराठा आरक्षण: केंद्राने सकारात्मक भूमिका घ्यावी - अशोक चव्हाण

मराठा आरक्षण: केंद्राने सकारात्मक भूमिका घ्यावी – अशोक चव्हाण

Related Story

- Advertisement -

राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भात आज बैठक पार पडली. येथे ८ मार्चला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी अशोक चव्हाण बोलत होते. याशिवाय, मराठा आरक्षण टिकण्यासाठी जे आवश्यक ते केलं जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (central government should take positive steps on Maratha reservation, says Ashok chavan)

मराठा आरक्षणावर ८ मार्चला सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी केंद्रराने सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. आज झालेल्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. आमचे वकील मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया हे देखील बैठकीला उपस्थित होते. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. केंद्राने सकारात्मक भूमिका घ्यावी यावर ते सकारात्मक होते. जमल्यास मी केंद्राशी बोलेन, असं देखील फडणवीस यांनी सांगितल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. दरम्यान, आज झालेल्या बैठकीला केंद्रीय न्याय व विधी मंत्री रविशंकर प्रसाद अनुपस्थित होते.

मराठा आरक्षणप्रश्नी इच्छाशक्तीचा अभाव – उदयनराजे भोसले

- Advertisement -

मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा अरक्षणाविषयी राज्य सरकारबाबत नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं उदयनराजे म्हणाले. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावा. ही सर्व राजकीय पक्षांची नैतिक जबाबदारी आहे, असं उदयनराजे म्हणाले. राज्यातील आधीच्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोग नेमला. गायकवाड आयोगाने दिलेल्या अहवालात राज्यातील ७० टक्के मराठा समाज मागास असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे सरकार ईसीबीसी सवलीत लागू करतंय, हा कोर्टाचा अवमान आहे, असं उदयनराजे म्हटलंय. मराठा समाजाच्या विकासाठी स्थापन केलेल्या सारथी सारख्या संस्था अखेरच्या घटका मोजत आहेत, असं म्हणत उदयनराजेंनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा समाजाचे तरुण दिशाहीन झाले आहेत. वेळेत न्याय होणं काळाची गरज आहे. पण यासाठी राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतोय, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

- Advertisement -