घरताज्या घडामोडीक्वारंटाईनचा शिक्का घ्या, नाही तर दंड होणारच !

क्वारंटाईनचा शिक्का घ्या, नाही तर दंड होणारच !

Subscribe

परदेशातून आलेल्या प्रत्येकाला सक्तीने १४ दिवसांचे क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी घरगुती क्वारंटाईनचा पर्याय देण्यात येणार आहे.

देशाबाहेरून येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवाशासाठी सक्तीने हातावर स्टॅम्पिंग करण्याचा विचार केंद्र सरकारमार्फत करण्यात येत आहे. प्रत्येक प्रवाशाने भारतातल्या एअरपोर्टवर दाखल झाल्यानंतर एका विशेष शाईच्या माध्यमातून यांचे स्टॅम्पिंग करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात येणार असल्याचे कळते. परदेशातील आलेल्या लोकांना ट्रॅक करणे सोपे व्हावे म्हणून हा निर्णय़ घेण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. तसेच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गरजेच्या असलेल्या १४ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी टाळणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा विचार केंद्रात होत असल्याचे कळते. परदेशातून आलेल्या लोकांपासून इतरांना करोनाचा प्रसार होऊ म्हणूनच सक्तीने क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची भूमिका केंद्राकडून समोर येत आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ रनदीप गुलेरिया यांनी कम्युनिटी इन्फेक्शन रोखण्यासाठीच असा उपाय गरजेचा आहे अशी माहिती हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

अनेक लोकांकडून क्वारंटाईन होण्यासाठी टाळाटाळ होत आहे. म्हणूनच लोकांना स्टॅम्प करून घरातच क्वारंटाईन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. लोकांनी सामाजिकदृष्ट्या अधिक जबाबदारीने वागावे म्हणूनच हा पुढाकार असल्याचे केंद्रातील आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. अनेक प्रकरणांमध्ये लोक हे क्वारंटाईनही करून घेत नाहीत. एकगठ्ठा अनेक लोकांना यामधून (कम्युनिटी इन्फेक्शन) होण्याची शक्यता पाहता हे स्टॅम्पिंग गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक राज्यांमध्ये आता क्वारंटाईन करण्यासाठी हॉस्पिटलमधील संख्या वाढू लागली आहे. म्हणूनच यापुढच्या काळात हॉस्पिटलच्या यंत्रणेवर भार आणण्यापेक्षा लोकांना घरातच क्वारंटाईन करण्याचा सल्ला आरोग्यविभागाकडून देण्यात आला आहे. अनेक लोक स्वतःहून स्क्रिनिंगसाठी पुढे येत नाहीत. तसेच क्वारंटाईन करून घेत नाहीत हाच करोनाचा प्रसार रोखण्यातला सर्वात मोठा धोका असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -