घरमहाराष्ट्रदुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी मदत करू - मोदी

दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी मदत करू – मोदी

Subscribe

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. शिवाय, राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचे देखील त्यांनी कौतुक केले.

महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आणि सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. शिर्डीतील साई समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिले. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच शिर्डीमध्ये आलेत. यावेळी त्यांनी  उपस्थित जनसमुदायाशी देखील संवाद साधला. यावेळी जवळपास ४० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे देखील यावेळी हजर आहेत. साईचरणी लीन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी मराठीतून संवाद देखील साधला. महाराष्ट्र सध्या भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. पावसानं ओढ दिल्यानं राज्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्राकडे दुष्काळ निवारणासाठी मदतीची मागणी केली. त्यानंतर मोदींनी देखील मदतीचे आश्वासन दिले. ३१ ऑक्टोबरला राज्यातील दुष्काळाची घोषणा केली जाऊ शकते. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं धरणं, नदी, नाल्यांमध्ये देखील पाण्याची पातळी खाली गेली आहे.

वाचाराज्यात भीषण दुष्काळ?

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

भाषणाची सुरूवात झाली ती मराठीतून. यावेळी शिर्डीला येण्याचा खूप आनंद झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. दरम्यान, साईबाबांनी दाखवलेल्या मार्गावर साई ट्रस्ट काम करत असून साई सेवकांना मी मनापासून नमन करतो असे गौरोद्गार देखील मोदींनी यावेळी काढले. यापुर्वीच्या सरकारने ४ वर्षात केवळ  २५ लाख घरे बांधली. शिवाय, आम्ही ज्यावेगाने काम करतोय. पण, १ कोटी २५ लाख घरे बांधायला काँग्रेसला २० वर्षे लागली असती अशा शब्दात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर देखील टीका केली. यावेळी पंतप्रधानांनी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची देखील स्तुती केली.  महाराष्ट्राने सामाजिक समरसता शिकवली. संतांनी समानतेचा मार्ग दाखवला असे गौरोद्गार देखील यावेळी पंतप्रधानांनी काढले.

- Advertisement -

लोकसभेची तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या दौऱ्यानिमित्त भाजपनं लोकशाहीचे रणशिंग देखील फुंकले आहे. मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी मंत्र्यांना खास आदेश देण्यात आले होते. जवळपास ३ लाख लोक यावेळी उपस्थित राहतील याची खबरदारी घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती माय महानगरला सुत्रांनी दिली आहे.

वाचा – पुण्यात दुष्काळी परिस्थिती कागदावरच; तर राजकिय नेते राजकारणात दंग

वाचा – दुष्काळाआडून भाजपचा प्रचार दौर्‍याचे वेळापत्रक ठरले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -