घरमहाराष्ट्रकेंद्राकडून महाराष्ट्राला मोठा निधी मिळणार; नीती आयोगाच्या बैठकीबाबत एकनाथ शिंदेंची माहिती

केंद्राकडून महाराष्ट्राला मोठा निधी मिळणार; नीती आयोगाच्या बैठकीबाबत एकनाथ शिंदेंची माहिती

Subscribe

मात्र मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने मुख्यमंत्र्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. याचे पहिले कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे राज्यात आता मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला आहे. तर दुसरं म्हणजे नीती आयोगाच्या बैठकीतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले तिसऱ्या रांगेतील स्थान. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदी यांच्या अगदी शेजारी पहिल्या रांगेत आहे, मात्र जीडीपीमध्ये सर्वात मोठा वाटा असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आले.

ज्यावरून सोशल मीडियावर चांगलाच वाद उफाळून आला आहे. दरम्यान मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यातील नीती आयोगाच्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठा निधी मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणाले की, नीती आयोगाच्या बैठकीत केंद्र सरकारकडून राज्याला भरीव निधी मिळणार आहे. या निधीतून राज्यातील अनेक विकास प्रकल्प मार्गी लावणार आहोत. दरम्यान मुख्यमंत्री हिंगोली दौऱ्यावर जाणार होते, मात्र मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने मुख्यमंत्र्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु आहे. या बैठकीला शिंदे समर्थक आमदार रामदास कदमही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाल्याची माहिती असून यात मंत्रिमंडळाच्या यादीवर अंतिम निर्णय घेण्यात येत असल्याचे म्हटले जातेय.

यात येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेश पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोना असतानाही अधिवेशन अवघ्या सात दिवस होणार असल्याने विरोधकांकडून कडाडून विरोध होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भंडाऱ्यातील पीडितेवरील अत्याचाराला पोलिसांची बेफिकीरीही कारणीभूत? वैद्यकीय चाचणीतून आले सत्य समोर

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -