घरCORONA UPDATECorona Live Update: धक्कादायक! राज्यात २४ तासांत ६३ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Corona Live Update: धक्कादायक! राज्यात २४ तासांत ६३ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यात २४ तासांत ६३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये मुंबईत ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरात ३, रायगडमध्ये ३, ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १, लातूरमध्ये १ तर अमरावतीमध्ये देखील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यभरात मृतांचा आकडा ११९८ झाला आहे. एकूण २३४७ नवीन रुग्ण सापडले असून आता रुग्णसंख्या ३३ हजार ५३वर गेली आहे. राज्यात आजपर्यंत ७६८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (सविस्तर वाचा)


नाशिक जिल्हयात अशी असेल नियमावली

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या अधिकारानूसार नाशिकमध्ये रेड झोन मधील कंटेनमेंट झोन वगळता इतर व्यवहार मात्र पूर्वीप्रमाणे ९ ते ५ या वेळेतच सुरू ठेवता येतील. शासनाच्या निर्देशानूसार यात वेळोवेळी बदल करण्यात येतील अशी माहीती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगांवमध्ये मात्र अत्यावश्यक सेवा वगळता पुर्णतःलॉकडाउन राहणार आहे. (सविस्तर वाचा)


नाशिक जिल्ह्यात रविवारी दिवसभरात सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. हे सातही रुग्ण मालेगावचे रहिवासी आहेत. जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ७९१ झाली आहे. एकट्या मालेगाव शहरातील बाधित रुग्णांची संख्या ६१७ आहे. दरम्यान, मालेगावात पुन्हा नऊ मृत्यूंची नोंद झाली असून, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३६ झाली आहे. त्यापैकी ४० मृत रुग्ण मालेगाव व उर्वरित दोन नाशिक शहरातील आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

भंडारा जिल्हा ग्रीन झोनमधून पुन्हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे. पुण्यावरुन आलेल्या वयोवृद्ध पती-पत्नी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दाम्पत्याला पुण्याहून खाजगी गाडीत घेऊन येणाऱ्या चालकाला आणि त्याच्या परिवाराला क्वारंटाईन करण्यात आले आहे. या कोरोनाबाधित दाम्पत्याशी संबधित २९जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ३ पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हयात आढळलेले असून एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हयात दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली आहे.


नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली  असून आतापर्यंत १ हजार १२८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ मेपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आले असून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद सुरू… (सविस्तर वाचा)


देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजार ९२७ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत ४ हजार ९८७ नव्या रुग्णांची वाढ यामध्ये झाली आहे. ही आतापर्यंतची २४ तासांत झालेली सर्वाधिक वाढ असल्याचे सांगितले जाते. देशात सध्या ५३ हजार ९४६ अॅक्टिव कोरोना केसेस असून ३४ हजार १०९ रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण २ हजार ८७२ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. मात्र गेल्या २४ तासांत १२० जणांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पॅकेजसंदर्भात गेले काही दिवस सतत पत्रकार परिषदेतून माहिती देत आहेत. आज या घोषणांचा पाचवा आणि शेवटचा दिवस असेल. ‘स्वावलंबी भारत’ आर्थिक पॅकेज संदर्भात आज पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत.


गेल्या ५४ दिवसांपासून देश लॉकडाऊन आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असून केंद्र सरकार चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा आज करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, पुढील टप्प्यातील लॉकडाऊन हा नव्या ढंगात असणार आहे. त्याची नियमावली ही पहिल्या तीन लॉकडाऊनपेक्षा खुपच वेगळी असेल. त्यामुळे यंदाचा हा लॉकडाऊन कसा असेल, याबाबत नागरिकांमध्ये कुतुहल आहे. केंद्राने राज्यांकडूनही काही दिवसांपूर्वी त्यांचे अहवाल आणि सुचना मागवल्या होत्या. त्याचा विचार करून ही नवीन नियमावली बनवण्यात आली असावी. असे म्हटले जात आहे. यापूर्वी तीन टप्प्यांमध्ये देश लॉकडाऊन झाला आहे. २४ मार्च ते १४ एप्रिल, १५ एप्रलि ते ३ मे आणि ४ मे ते १७ मे असा हा कालावधी होता. आता पुढील लॉकडाऊनचा टप्पा किती कार्यकाळाचा असेल, हे आज समजणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -