घरताज्या घडामोडीकेंद्र vs राज्य सरकार वादाला पुन्हा 'ऑक्सिजन'

केंद्र vs राज्य सरकार वादाला पुन्हा ‘ऑक्सिजन’

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडून ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येत होते. पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असा वाद पेटलेला पहायला मिळाला. पण दिवसअखेर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या मुद्द्यावर अखेर पडदा पडला. डॉ हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच आरोग्याच्या पायाभूत सुविधेशी संबंधित सुविधा, औषधे आणि उपचारासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठीची मदत करू असेही आश्वासन दिले. त्यामुळे ऑक्सिजनच्या मुद्द्यावर रंगलेल्या नाट्यावर दिवसअखेरीस पडदा पडला.

सध्या देशात एकूण क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजन निर्मिती होत आहे. तसेच औद्योगिक वापरासाठी असलेल्या सर्व ऑक्सिजनचा साठा वैद्यकीय वापराकडे वळवण्यात आला आहे. केंद्र सरकार, सर्व राज्यांच्या सतत संपर्कात असून, त्यांच्या आवश्यकता समजून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

- Advertisement -

कालच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र आणि राज्याने या संकटकाळात परस्पर समन्वयाने काम करावे, अशी सूचना केल्याचे गोयल यांनी सांगितले. या मुद्यावर राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या राजकारणबाबत खेद व्यक्त करत, महाराष्ट्राला आजवर देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा झाला आहे, अशी माहिती गोयल यांनी या ट्विट्समध्ये दिली आहे.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या मुद्द्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. केंद्राने ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये मदत करावी असा मुद्दा उद्धव ठाकरेंकडून लावून धरण्यात आला आहे. पण पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या अभिप्रायामुळे महाराष्ट्रापासून ते केंद्रापर्यंत पुन्हा एकदा टोकाचे आरोप प्रत्योरोपांचे चित्र रंगल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया न येताच पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूकांमध्ये व्यस्त असल्याची बातमी पसरली. त्यावर केंद्रातूनही प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोएल यांनी महाराष्ट्राकडून राजकारण होत असून महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. केमिकल्स आणि फर्टिलायजर विभागाचे केंद्रातले राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही रेमडेसिवीरच्या पुरवठ्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे आणि अर्धवट माहितीवर आधारीत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

पण त्यानंतरच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून या संपुर्ण प्रकरणावर पडदा टाकला. डॉ हर्ष वर्धन यांनी covid-19 च्या प्रकरणांमध्ये कंटेन्टमेंट, सर्वेलन्स आणि उपचार करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळेच कोरोनाच्या लढाईत पाच महत्वाचे आधारस्तंभ असलेल्या टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, कोविडसाठीचा प्रतिसाद आणि लसीकरण या पंचसूत्रीचा अवलंब करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -