घरCORONA UPDATEराज्य आरोग्य विभाग व पालिकेच्या कामावर केंद्रीय आरोग्य टिम संतुष्ट!

राज्य आरोग्य विभाग व पालिकेच्या कामावर केंद्रीय आरोग्य टिम संतुष्ट!

Subscribe

केंद्रीय आरोग्य टीमने केली कोविड केंद्राची पाहणी; कोविड सेंटर, वॉर्ड वॉर रुमचे केले निरीक्षण

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईसह राज्यातील वाढती रुग्णसंख्या व गंभीर परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाची ३० जणांची टिम गुरुवारी राज्यात दाखल झाली. या टिममधील दोन सदस्यांनी आज मुंबईतील बीकेसी जम्बो कोविड केअर सेंटर व वॉर्ड वॉर रुमची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, पालिका प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर केंद्रीय टिमने समाधान व्यक्त केल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला.

मुंबई सहित राज्यात वाढती कोरोना रुग्णसंख्याबाबत आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच करोना रोखण्यासाठी राज्य आरोग्य विभाग कुठे कमी पडत नाहीये ना? याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने 30 जणांची टिम राज्यात दाखल झाली. यात वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे. या टिममधील सदस्यांनी मुंबईतील बीकेसी कोविड सेंटर व पालिका वॉर्ड वॉर रुमची पाहणी केली

- Advertisement -

राज्यात आज ३२२ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. बुधवारी राज्यात ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, गुरुवारी हा आकडा वाढलेला दिसला. गुरुवारी राज्यात ३७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.७७ टक्के इतका झाला आहे. तसेच गुरुवारी राज्यात ५६ हजार २८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. बुधवारच्या तुलनेत हा आकडा कमी झालेला दिसला. राज्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३२ लाख २९ हजार ५४७ झाली असून राज्यात ५ लाख २१ हजार ३१७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -