घरमहाराष्ट्रभारतात ३० लाख बोगस सिमकार्ड; केंद्र सरकारने आणला 'साथी'

भारतात ३० लाख बोगस सिमकार्ड; केंद्र सरकारने आणला ‘साथी’

Subscribe

 

नवी दिल्लीः भारतात तब्बल ३० लाख सिमकार्ड बोगस असल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली. हे बोगस सिमकार्ड दूरसंचार मंत्रालयाने बंद केले. यापुढे जात केंद्र सरकारने आता संचार साथी पोर्टलं लॉंच केलं आहे. या पोर्टलद्वारे आपल्या मोबाईल क्रमांकावर किती सिमकार्ड काढण्यात आले आहेत याची माहिती मिळू शकणार आहे.

- Advertisement -

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हे पोर्टल लॉंच करण्यात आलं. हे पोर्टल बहुआयामी आहे. मोबाईल चोरीपासून बोगस सिमकार्डची माहिती या पोर्टलमध्ये मिळते. मोबाईल चोरीला गेल्यास या पोर्टलद्वारे ऑनलाईन ट्रॅक करता येतो. यासोबतच तुमच्या क्रमांकावर किती सिमकार्ड घेण्यात आले आहेत याची माहितीही मिळते. जर तुमच्या लक्षात आलं की अन्य क्रमांक बनावट आहे. तर तो मोबाईल क्रमांक तुम्ही बंद करु शकता, अशी सुविधा या पोर्टलमध्ये आहे.

बनावट सिमकार्ड बंद करण्याची सुविधा या पोर्टलमध्ये आहे. मात्र बनावट कॉल रोखण्याचे कोणतेच तंत्र या पोर्टलमध्ये नाही. त्यामुळे वारंवार येणारे फसवणुकीचे कॉल कसे आणि कधी रोखले जाणार, असा प्रश्न सर्वसामान्य करत आहेत.

- Advertisement -

भारतात सुमारे ३० लाख सिमकार्ड बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये तब्बल ५५ हजार तर मुंबईत ३० हजार बनावट सिमकार्ड जारी झाल्याचे समजते आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.

केंद्रीय दूरसंचार विभागाने बनावट सिमकार्डबाबत माहिती देताच मुंबई पोलीस तातडीने कामाला लागले. पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. यासाठी मुंबईतील व्हीपी रोड पोलीस स्टेशन, डीबी मार्ग पोलीस स्टेशन, मलबार हिल पोलीस स्टेशन, सहार पोलीस स्टेशन आणि बांगूरनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली. या पथकांनी शोध घेतल्यानंतर मुंबईतील ६२ जणांनी स्वत:चे फोटो वापरुन एकूण ८५०० सिमकार्ड जारी केल्याचा माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच गुन्हे नोंदवले आहेत. १३ जणांना अटक केली आहे. मिरारोड येथे पोलिसांनी ५२ सिमकार्ड जप्त केले. तेथील एका कॉल सेंटरमधून ही सिमकार्ड जप्त करण्यात आली.

व्ही.पी. रोड पोलिसांनी ३७८, डी. बी. पोलिसांनी १९० तर मलबार पोलिसांनी ६८५ सिमकार्ड जप्त केली. धक्कादायक बाब म्हणजे अब्दुल मन्सूरी या आरोपीने स्वतःचा फोटो वापरून ६८५ सिमकार्ड घेतले होते. त्याला मलबार पोलिसांनी अटक केली आहे. सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने भारतातील ३० लाख बनावट सिमकार्ड बंद केले आहेत. मुंबईत ३० हजार सिमकार्ड जारी करण्यात आली होती. त्याचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -