घरताज्या घडामोडीउद्योग आपल्या दारी! २१ ते २३ डिसेंबर दरम्यान केंद्रीय अधिकाऱ्यांची टीम सिंधुदूर्ग...

उद्योग आपल्या दारी! २१ ते २३ डिसेंबर दरम्यान केंद्रीय अधिकाऱ्यांची टीम सिंधुदूर्ग जिल्ह्यात येणार

Subscribe

ओबीसी आरक्षण जाण्यास ठाकरे सरकार जबाबदार

जिल्ह्यात विविध उदयोग आणून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न असून त्यासाठी २१ ते २३ डिसेंबरला केंद्रीय अधिकाऱ्याची टीम जिल्ह्यात येणार आहे अशी माहीती खासदार नारायण राणे यानी आज पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय मेडिकल कॉलेजची परवानगी दिल्लीतून रोखली जाते असा आरोप केला जातो याकडे लक्ष वेधले असता शासकीय मेडीकल कॉलेजची परवानगी मी रोखलेली नाही ती परवानगी मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध कराव्या लागतात नियमात सर्व बसल पाहीजे ,तपासणीच्या वेळी सर्व सुविधा पूर्ण असाव्या लागतात. इथे शासकीय मेडिकल कॉलेजसाठी काहीच सुविधा नसताना परवानगी मागत आहेत मग परवानगी कशी मिळणार असा सवालही राणेंनी उपस्थित केला

जिल्हाधिकाऱ्याकडे दोन वेळा पत्र पाठवूनही उत्तर नाही 

जसा सरकारमध्ये सावळागोंधळ सुरू आहे तसा जिल्हा प्रशासनामध्येही सुरू आहे कोणकोणाला विचारत नाही अशी अवस्था आहे सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणे व सौंदर्यकरणं करण्याबाबत ३१ डिसेंबर २०१८ आणि २९ मे २०२१ ला दोन वेळा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले मात्र या पत्राना काहीच उत्तर दिलं नाही त्यामुळे सर्व आलबेल असल्याची टीका करत ना.राणेंनी नाराजी व्यक्त केली. पडवे मेडिकल कॉलेजच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली,संदीप कुडतरकर, डॉ मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते

- Advertisement -

वैभववाडी, देवगड ,कुडाळ व दोडामार्ग या चारही नगरपंचायत व जिल्हा बँकेची निवडणूक संपेपर्यंत आपण जिल्हा सोडणार नाही जिल्ह्यातच थांबणार आहे या चारही नगरपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय होणार आहे कारण चारही नगरपंचायत क्षेत्रात भाजपाने अतिशय चागली कामे केली आहेत मात्र शिवसेना ,कॉग्रेस व राष्ट्रवादीने कुठलेही शैक्षणिक,विकासात्मक, सामाजिक किंवा विधायक काम केलेले नाही विरोधकांनी साधी एक शाळा किंवा वृद्धाश्रम बांधला की हे दाखवून द्यावे असे आव्हान दिले.

कोरोना काळातही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लसीकरण करणे,औषधे देणे,रुग्ण बरा होईपर्यंत काम केले मात्र महाराष्ट्र मधील सत्तारूढ पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काहीही काम केलेले नाही रुग्ण दगावण्यास ठाकरे सरकारच जबाबदार आहे या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता सर्वांगीण विकास करणाऱ्या भाजपाच्या उमेदवारानाच मतदान करावे यासाठी आपण पुढील दोन दिवसात वैभववाडी, देवगड,दोडामार्ग आणि कुडाळ नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ भेटी देणार आहे १९ डिसेंबरला कुडाळला प्रचारसभाही घेणार आहे अशी माहिती राणेंनी दिली

- Advertisement -

जिल्हा बँक अध्यक्षांच्या व्यवहाराची चौकशी लावणार

जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्षांनी संचयनी मध्ये अफरातफर केली असून त्याची केस न्यायालया प्रलंबीत आहे अशी अफरातफर करणारी व्यक्ती विरोधी पॅनलमध्ये असल्याने सुज्ञ मतदार त्यांना मतदान करणार नाहीत. महाराष्ट्रमध्ये महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर पडत आहेत सहकारात राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी सुरू आहे त्यामुळे अफरातफर करणाऱ्या आणि भ्रष्टाचाऱ्याच्या हाती बँक देणे शेकऱ्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे त्यामुळे विरोधकांना मतदान करू नका असे आपण मतदारांना पटवून सांगणार आहे असे ना.राणे म्हणाले राज्यात भाजपने नाही तर राष्ट्रवादीने बँका बुडवल्या असल्या चा आरोपही त्यांनी केला.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थानिक लोकांना हवा असेल तर आपला त्याला पाठींबा आहे असे राणे म्हणाले तर राजकिय ओबीसी आरक्षण जाण्यास ठाकरे सरकारच जबाबदार आहे मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे व निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूकाना सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे सुतोवाच खासदार राणे यानी केले.


हेही वाचा – नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकतर्फी विजय भाजपचा होणार, नारायण राणेंचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -