घरताज्या घडामोडीगणपती बाप्पा मोरया...! कोकण मार्गावर १६२ रेल्वे चालणार

गणपती बाप्पा मोरया…! कोकण मार्गावर १६२ रेल्वे चालणार

Subscribe

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या आणि गेलेल्यांना पुन्हा येण्यासाठी एक चांगली बातमी मध्य रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वे कोकणासाठी १६२ विशेष रेल्वे गाड्या सोडणार असल्याची घोषणा केली आहे. उद्यापासून या गाड्यांचे बुकिंग सुरु होणार आहे. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या विशेष गाड्या धावणार आहेत.

या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सुटणार आहेत. या सर्व गाड्यांमध्ये गणेशभक्तांना प्रवास करता येईल. मात्र या गाड्यांमधून प्रवास करताना शासनाने कोरोना व्हायरससंबंधी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल.

- Advertisement -

२२ ऑगस्टपासून गणपतीचे आगमन होत आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो गणेशभक्त मुंबईहून कोकणात जातात. मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी कोकणात जावे की नाही? या संभ्रमात राज्य सरकार आणि कोकणातील प्रशासन होते. कोकणात जाण्याची परवानगी दिली तरी प्रवासाची अपुरी साधने असल्यामुळे सर्वांनाच जाणे शक्य होणार नाही, अशी परिस्थिती होती. काही दिवसांपुर्वीच राज्य सरकारने चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर आता मध्य रेल्वेने देखील कोकणवासियांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -