घरमहाराष्ट्रCentral Railway : मध्य रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मिळाले 'एवढे' उत्पन्न; वाचा सविस्तर

Central Railway : मध्य रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मिळाले ‘एवढे’ उत्पन्न; वाचा सविस्तर

Subscribe

2022-23 मध्य रेल्वेच्या प्रवाशांची संख्या 1208.78 दशलक्ष प्रवास केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवाशांमध्ये 9.08 टक्क्यांने वाढली आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 14867.20 कोटीचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. यात मध्य रेल्वेने फक्त जानेवारी महिन्यात प्रवासी उत्पन्नातून 1637.69 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मध्य रेल्वेनेच्या माहितीनुसार, मध्य रेल्वेतून 144.93 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला आहे तर, सापडलेल्या वास्तूंतून 856.41 कोटी, कोचिंग महसूल आणि विविध कमाईतून मध्ये रेल्वेला 110.63 कोटी रुपये मिळाले आहेत.

गेल्या वर्षाची तुलना केली तर, यंदा मध्य रेल्वेला 13.41 टक्के जास्तची कमाई केल्याची माहिती मध्य रेल्वेकडून मिळाली आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेच्या महसूल 1310.79 कोटी मिळाला होता. यंदा 6071.04 कोटी प्रवासी महसुलातून मिळाली आहे. गत वर्षी हा आकडा 5291.73 कोटी एवढा होता.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : नांदेड हा काँग्रेसचाच बालेकिल्ला, कुठल्या…; पटोलेंची टीका

मध्य रेल्वेला सापडलेल्या वास्तूंमधून 7674.95 कोटी मिळाले तर, गेल्या वर्षी हा आकडा 6799.67 कोटी होता आणि इतर कोचिंग आणि विविध महसुलातून 1121.21 कोटी मिळाले. गत वर्षीच्या 1018.39 कोटी मिळाले होते तर, यंदा 2023-24 मध्ये मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्याची संख्या ही 1318.58 दशलक्ष झाली आहे. तसेच 2022-23 मध्य रेल्वेच्या प्रवाशांची संख्या 1208.78 दशलक्ष प्रवास केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवाशांमध्ये 9.08 टक्क्यांने वाढली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -