घरमहाराष्ट्रघाट, बोगद्यातून पहिला एलर्ट देणार 'लिकी'

घाट, बोगद्यातून पहिला एलर्ट देणार ‘लिकी’

Subscribe

मध्य रेल्वे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक लिकी केबलची यंत्रणा घाट विभागातील १७ रेल्वे बोगद्यांमध्ये बसविणार आहे  

खंडाळा ते ईगतपुरी घाट विभागात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा घटना घडतात. त्यातच तिथे नेटर्वकची  समस्या असल्याने रेल्वेच्या लोको पायलट व  गार्ड यांना संभाषण साधताना अडथळा निर्माण होतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आता रेडिओ तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. गेल्या वर्षी  मध्य रेल्वेने  सुरक्षेच्या दुष्टीकोनातून फायबर डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट स्टिस्टमने तयार केलेला माइक्रोवेब टॅावर अर्थात लिकी केबल बोगदा क्रमांक ४९ मध्ये लावला होता. आता ही अत्याधुनिक यंत्रणा घाट विभागातील १७ रेल्वे बोगद्यांमध्ये बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आता आपत्कालीन परिस्थितीमध्ये ट्रेनचे गार्ड, ड्रायव्हर यांना जवळच्या स्टेशन मास्तरशी तात्काळ संवाद साधता येणार आहे.

अडथळा होणार दूर…

पावसाळ्यात खंडाळा आणि ईगतपुरी घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतात. रुळावर आलेल्या मोठमोठ्या दगडांमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांची सेवा खोळंबते. तसेच बोगद्यात,घाटात ट्रेन धावत असताना कोणतीही आपत्कालीन  परिस्थिती उद्भवल्यास किंवा रेल्वे रुळावर दरड कोसळली असेल तर गार्ड आणि ड्रायव्हरला नजीकच्या रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तरला त्याबाबत माहिती देउन मदत मागवी लागते. मात्र घाट विभागात नेटर्वक कमी असल्यामुळे रेल्वेच्या लोको पायलेट आणि गार्डमध्ये संभाषण होउु शकत नाही. हा अडथडा दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने आता लिकी केबल लावण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सुरक्षेत होणार वाढ

बोगद्यातून रेल्वे गाड्या जात असताना लोको पायलेट आणि गार्डमध्ये संपर्क होउु शकत  नाही. यावेळी वॉकी-टॉकीचाही फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे मध्य रेल्वे गेल्या दोन वर्षांपासून नेटवर्कची समस्या दूर व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. आता मध्य रेल्वेने यावर मार्ग काढताना रेडिओ तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. ते आता घाट विभागातील आणखी 17 बोगद्यांमध्ये  अत्याधुनिक  लिकी केबलची यंत्रणा बसवणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेत वाढ होणार आहे.

पावसाळयात विशेष फायदा

नोव्हेंबर २०१९ मध्ये मध्य रेल्वेवरील सर्वप्रथम बोर घाटात मंकी हिल ते खंडाळा दरम्यानच्या सर्वात मोठ्या (२.४ किलोमीटर)बोगद्यात ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर बसविली होती. त्यासाठी २ कोटी ४७ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. या प्रणालीचा रेल्वेला फायदा होत असल्यामुळे आता आणखी १७ बोगद्यात ही प्रणाली बसवण्यात येणार आहे.  ही यंत्रणा खासकरून भूमिगत खाणी आणि लेण्यांमध्ये वापरली जाते. रेडिओ तंत्रज्ञान कोणत्याही हंगामात उपयुक्त ठरते. यामध्ये बोगद्यात एक केबल टाकली जात असून  त्यातून रेडिओ लहरी उत्सर्जित होतात.त्यामुळे संवाद साधताना कोणताही अडथळा येत नाही.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -