Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2532 जागांसाठी भरती

Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2532 जागांसाठी भरती

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनंतर आता महाराष्ट्रात रेल्वेमध्ये तब्बल २५३२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमधून तब्बल २५०० जागांवर ही भरती केली जाणार आहे. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार आहे. या पदासाठीची अर्ज प्रक्रिया 6 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटी तारीख ५ मार्च २०२१ असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. याशिवाय परळच्या वर्कशॉपमध्ये, कल्याण डिझेल शेड आणि मनमाडच्या वर्कशॉपमध्येही विविध जागांवर भरती करण्यात येत आहे.

या पदांसाठी 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये NCVT, तसेच फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स आदी संबंधित शिक्षण असणे गरजेचे असणार आहे.

- Advertisement -

https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता. तसेच अधिक माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1U2kcBm82EDmUNUy6-dw58cSL-aMsgje8/view या पीडीएफ फाईलचा देखील आधार घेऊ शकता.

- Advertisement -