घरमहाराष्ट्रकेंद्राने महाराष्ट्राचे टेन्शन वाढवले, दिवसाला ५० हजार रेमडेसिवीरची गरज असताना दिला २६...

केंद्राने महाराष्ट्राचे टेन्शन वाढवले, दिवसाला ५० हजार रेमडेसिवीरची गरज असताना दिला २६ हजारांचा कोटा- नवाब मलिक

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक वाढतेय. यात अनेक रुग्णांना उपचारासाठी रेमडेसवीर इंजेक्शनची गरज भासतेय. परंतु पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा जाणावत असल्याने काळाबाजार सुरु आहे. यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारकडे रेमडेसिवीरचा पुरवठ्या वाढवून देण्याची वारंवार मागणी करत आहे. राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनीही ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र यातील फक्त ३६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा राज्याला उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्राला होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावर नवाब मलिक यांनी नाराजी दर्शवली आहे. एकीकडे राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा अपुरा पडत आहे. यात केंद्राने महाराष्ट्राला गरजेपेक्षा कमी इंजेक्शन साठा उपलब्ध करुन दिल्याने राज्यासमोरील कोरोना संकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी ”केंद्र सरकारने आम्हाला दररोज ५०००० इंजेक्शनचा पुरवठा करत राज्यातील रुग्णांची गरज भागवावी” अशी मागणी केली होती. परंतु केंद्राकडून दरदिवसा फक्त २६,००० रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा होत असल्याने वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात आणखी नवे संकट निर्माण होईल अशी चिंता नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. मलिक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून यांबाबतीच माहिती दिली आहे.

- Advertisement -

नुकतेच केंद्र सरकारने विविध राज्यांना पुरवलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन साठ्याची माहिती जाहीर केली. या माहितीचा हवाला देत नवाब मलिक म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील विविध राज्यांना पुरवठा केलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची आकडेवारी जाहीर केली. यात महाराष्ट्रात वाढत्या आवश्यकतेनुसार ५०००० रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र केंद्र सरकारकडून राज्याला दरदिवसा फक्त ३६००० रेमडेसिवीर इंजेक्शन्स दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही केंद्रा सरकारकडून होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, ”रेमडेसिवीरची दररोज महाराष्ट्रमधील मागणी ५०००० ची आहे. यात मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार ३३००० ते ३६००० पुरवतेय. मात्र आता केंद्र सरकारने ताब्यात घेतले, आत्ता महाराष्ट्राला मिळणार २६००० महाराष्ट्राचा असा छळ कश्यासाठी ? असा सवाल केंद्राला विचारला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -