देशात ‘टोमॅटो फ्लू’ची दहशत; केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

centre issues advisory to states on tomato flu asks to follow precautionary measures to prevent spread of disease

भारतात कोरोना, मंकीपॉक्सनंतर आता टोमॅटो फ्लूचा धोका वाढत आहे. देशात आत्तापर्यंत टोमॅटो फ्लूची 82 रुग्ण आढळून आले आहे, यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी राज्य सरकारांना खबरदारी घेण्याच्या सुचना देत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. तसेच या व्हायरसविरोधात उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध नसल्यावरही केंद्राने भर दिला आहे.

केरळनंतर कर्नाटक, तामिळनाडू आणि ओरिसमध्ये टोमॅटो फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. यात देशातील 82 रुग्णांमध्ये लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. यात लहान मुलांच्या अंगावर लाल रंगाचे फोड येतात आणि हळहळू ते फोड वाढत जातात. हे फोडनंतर टोमॅटोच्या आकाराचे होतात म्हणू या फ्लूला टोमॅटो फ्लू म्हणतात. यात लहान मुलांच्या हात, पाय आणि तोंडावर आजार खूप सामान्य आहेत. त्यामुळे प्रामुख्याने 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हा आजार आढळतो.

केंद्राने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, लहान मुलांना या आजाराची लक्षणं आणि त्याच्या दुष्परिणांबाब शिक्षित केले पाहिजे. ‘टोमॅटो फ्लू’ इतर व्हायरल इन्फेक्शन्सप्रमाणे लक्षणे (ताप, थकवा, अंगदुखी आणि त्वचेवर पुरळ उठणे) दर्शवत असला तरी, व्हायरसचा SARS-CoV-2, मंकीपॉक्स, डेंग्यू किंवा चिकनगुनियाशी कोणताही संबंध नाही. या वर्षी 6 मे रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात ‘टोमॅटो फ्लू’चा पहिला रुग्ण आढळून आला होता यानंतर आतापर्यंत 82 रुग्ण आढळले आहेत.

लहान मुलांना टोमॅटो फ्लू होण्याचा धोका जास्त असतो आणि जर त्याचा प्रादुर्भाव रोखला गेला नाही आणि नियंत्रित केला गेला नाही तर संसर्ग प्रौढांमध्येही पसरू शकतो. ‘द लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन’ या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हा इशारा देण्यात आला आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार, केरळमधील कोल्लम जिल्ह्यात 6 मे रोजी टोमॅटो फ्लू ओळख पटली.

17 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, “मुलांना टोमॅटो फ्लू होण्याचा धोका जास्त असतो, कारण या वयोगटात विषाणूजन्य संसर्ग सामान्य आहे आणि जवळच्या संपर्कातून पसरू शकतो. लहान मुलं घाणेरड्या पृष्ठभागाला स्पर्श करतात, कोणत्याही वस्तू थेट तोंडात टाकतात यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो पण त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

अभ्यासानुसार, हा आजार जीवघेणा नसला तरी कोविड-19 महामारीचा भयावह अनुभव पाहता, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. कोविड सारख्या या विषाणूमध्ये ताप, थकवा, अंगदुखी आणि पुरळ यांसारखी लक्षणेही दिसू शकतात.


लाईफलाईन हॉस्पिटल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सुजित पाटकरांविरोधात गुन्हा दाखल