घरताज्या घडामोडीसीईटीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची शेवटची संधी

सीईटीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची शेवटची संधी

Subscribe

सीईटीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ७ सप्टेंबर ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सीईटीची परीक्षा १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनसाठी लागले आहे.

२०२०-२१ साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सीईटी करिता अर्ज भरला होता. पण फी भरावयाची राहिली होती किंवा जे विद्यार्थी दिलेल्या कालावधीत अर्ज भरू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सीईटी सेलकडून १२ अभ्यासक्रमाच्या साईटीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रियेची मुदतवाढ करण्यात आली आहे. यामध्ये तंत्र शिक्षण विभागाच्या ४ अभ्यासक्रमासाठी आणि उच्च शिक्षण विभागाच्या ८ अभ्यासक्रमांसाठी ही संधी उपलब्ध असणार आहे. महत्वाचे म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही शेवटची संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला असेल तर त्यांना पुन्हा अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. परीक्षा केंद्र बदल करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज भरला असले, ते विद्यार्थी नवीन अर्ज भरू शकतात. परंतु त्यांनी आधी भरलेल्या अर्जाचे शुल्क त्यांना परत मिळणार आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेश पत्र नवीन अर्जाच्या आधार तयार करण्यात येईल.


हेही वाचा – नीट, जेईई परीक्षांबाबत सहा राज्यांची फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -