Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही - भुजबळ

मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही – भुजबळ

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात राज्यभरात मराठा समाज मूक आंदोलन करत आहे. आज नाशिक येथे मूक आंदोलन होत आहे. या आंदोलनाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, भूमिका स्पष्ट करताना राज्यात होत असलेल्या ओबीसी आंदोलनाची भूमिका देखील स्पष्ट केली. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

“काहींचं म्हणणं आहे की ओबीसींचे जे आक्रोश मोर्चे सुरु झाले आहेत, ते मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असं नाही. दोन्ही समाज अडचणीत आहेत. मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं आणि ओबीसींचं असलेलं आरक्षणावर गदा आणली. सर्वोच्च न्यायालयाने माहिती गोळा करण्यास सांगितली, पण कोरोनाच्या काळात कोण माहिती गोळा करणार? कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर अडचणी निर्माण होता. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमचं आरक्षण वाचवा. म्हणून त्यांचा आक्रोश मोर्चा आहे. पण काही जे लोक आहेत, ते मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ते योग्य नाही,” असं छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisement -