घरताज्या घडामोडीपोलीस असल्याची बतावणी करत सौभाग्य लेण्यावर मारला डल्ला

पोलीस असल्याची बतावणी करत सौभाग्य लेण्यावर मारला डल्ला

Subscribe

नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करूनमहिलेला गळ्यातीलल दागिने काढण्यास भाग पाडून ते हातचलाखीने लंपास केल्याची घटना जयभवानीरोड परिसरात रविवारी (दि.२६) दुपारी घडली. याप्रकरणी बेबीताई सुभाष सोनवणे (६५, रा. जाचकमळा, जयभवानीरोड, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बेबीतीई सोनवणे जयभवानी रोडने घराच्या दिशेने पायी जात होत्या. त्या जाचक मळा येथे आल्या असत्या पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोनजण त्यांच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत. गळ्यावरील सोन्याची पोत व कानाला लावलेली कर्णफुले काढून ठेवा, असे त्यांना सांगितले. त्यांच्या विश्वास ठेवून सोनवणे यांनी गळ्यावरील पोत काढली. त्यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने ती पोत रूमालामध्ये बांधून व्यवस्थित ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने सोन्याची पोत, ओमपान, कर्णफुले असा सुमारे १४ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परदेशी करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -