Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पोलिस, प्रशासकीय अधिकाऱ्यांना 'सापां'बद्दल प्रशिक्षण

पोलिस, प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘सापां’बद्दल प्रशिक्षण

Subscribe

राजगुरूनगर पोलिस स्टेशन आणि पंचायत समिती खेड येथील कर्मचाऱ्यांना सापांना पकडण्याचं, त्यांना हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. शिवाय, विषारी साप आणि बिनविषारी साप याबद्दल माहिती देखील दिली गेली.

साप? बापरे बाप!! अशीच वेळ प्रत्येकाची साप दिसल्यानंतर होते. साप दिसल्यानंतर अनेकांची भीतीनं गाळण उडते. त्याला काहीजण अपवाद असतील देखील. पण, अशा लोकांची संख्या हातावर मोजण्याऐवढीच. नाही का? साप दिसला की ‘मारा’ हा शब्द प्रत्येकाच्या जणू पाचवीलाच पुजलेला. पण, आता जनजागृती झाल्यानं सर्पमित्रांना बोलावून सापाला पकडलं जातं. आता पोलिसांना देखील साप पकडण्याचं, त्यांना हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. होय!! तुम्ही वाचलंत ते अगदी बरोबर. राजगुरूनगर पोलिस स्टेशन आणि पंचायत समिती खेड येथील कर्मचाऱ्यांना सापांना पकडण्याचं, त्यांना हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं.
शासकीय काम करताना पंचायत समितीतील ग्रामसेवक, पोलिस, वनविभाग या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सापांबद्दल माहिती देण्यात आली. भविष्यात त्यांना सापांचा सामना करावा लागला तर काय करावं? याबद्दल माहिती देण्यात आली. फ्रेंडस ऑफ नेचर संस्थेच्या सर्प मित्रांकडून पोलीस आणि पंचायत समितीतील लोकसेवकांना सर्प साक्षरतेचे, सर्प हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन तस्कर, धामण आणि विषारी मण्यार याबाबतची माहिती देण्यात आली.
ग्रामीण असो वा शहरी भाग. या ठिकाणी शेती किंवा घरात वन्य प्राणी, साप अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यामध्ये कमी किंवा जास्त विषारी साप देखील असतात. त्यातुन काही गोंष्टींकडे दुर्लक्ष केले तर दुर्घटना होत असते. त्यासाठी फ्रेंडस ऑफ नेचर संस्थेच्या सर्प मित्रांकडून शासकीय कार्यालयात सापांचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोंम्पे, गट विकास आधिकारी इंदिरा आस्वार, चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील पवार, राजगुरुनगर पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी, चाकण,राजगुरुनगरचे पोलीस कर्मचारी यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. यावेळी सर्वांच्या शंकाचे निरसण देखील करण्यात आले.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -