घरताज्या घडामोडीमोचा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

मोचा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

Subscribe

उकाड्यात आणखी घट होणार

पुणे । राज्यात उष्णतेच्या लाटेने हाहाःकार माजलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून मात्र अचानक पावसाचे ढग आल्याने एकाककी तापमानात काही अंशांनी घट नोंदवण्यात आल्याचे पहायला मिळाले. तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. हा दिलासा आणखी काही काळ मिळण्याची शक्यता आहे, कारण येत्या दिवसात उकाड्यात आणखी घट होणार असून राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोचा चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून मंगळवार 9 मेपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत अधिक धोकादायक बनण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

चेन्नई आणि लगतच्या भागांमध्ये त्याचे वादळात रूपांतर होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -