घरमहाराष्ट्रपुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता; नांदेड, छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अवकाळी...

पुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता; नांदेड, छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अवकाळी पाऊस

Subscribe

हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसांत मध्य भारतात ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशातील वातावरण सातत्याने बदलत आहे. कुठे उन्हाचे चटके तर कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसांत मध्य भारतात ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ( Chance of stormy rain in the state for the next five days Unseasonal rain again in Nanded Chhatrapati Sambhajinagar )

राज्यात 1 मे रोजी विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. मराठवाड्यात रविवारी नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला, जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला, तर चोपड्यात गारपीट झाली.

- Advertisement -

जामनेरला वादळी तडाखा; 100 हून अधिक झाडे उन्मळून पडली

खानदेशात अवकाळी पावसाचा कहर झाला असून रविवारी वादळी पावसाचा तडाखा जामनेर तालुक्याला बसला. या वादळामुळे 100 हून अधिक झाडे उन्मळून पडली असून 200 वीज पोलचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर या भागातही पाऊस झाला. चोपड्यात गारपिटीचा फटका बसला.

( हेही वाचा: काय काम करावे लागते? कसे काम केल्याने पक्ष आपल्याला तिकिट देतो…; अजितदादांचा बावनकुळेंना टोला )

- Advertisement -

पूर्व भारतातही पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पूर्व भारतात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 मे 2 मे राजी अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपूरा आणि 1 मे ते 4 मे दरम्यान आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टीपासून आपली पिके वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -