घरताज्या घडामोडीMaharashtra Monsoon: पुढील २४ तासात राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon: पुढील २४ तासात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

आज आणि उद्या राज्यात एक ते दोन ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतर उसंत घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊसाने सुरुवात केली आहे. राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा सोमवारीच हवमान खात्याकडून देण्यात आला होता. गेली दोन दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. तर पुढील २४ तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Chance of torrential rain in maharashtra in next 24 hours)

- Advertisement -

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भाग हा एक शेअर झोन असल्याने गेल्या २ दिवसांपासून या भागात पाऊस सुरू आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकणी अतिमुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी मुसधार पावसाने हजेरी लावली. आज आणि उद्या राज्यात एक ते दोन ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा प्रभाव उत्तर कोकणातील ठाणे,पालघर आणि मुंबईतही दिसेल. या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात मध्य महाराष्ट्र,विदर्भ, मराठवाडा,कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण देखील निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज १८ ऑगस्ट रोजी राज्यातील नंदुरबार,धुळे,औरंगाबाद,नाशिक,जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतसह राज्यात विश्रांतीनंतर सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.


हेही वाचा – पुनर्विकासानंतर तळीये गाव बनणार आदर्श गाव, म्हाडा ३० एकरवर बांधणार २६१ घरं

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -