घरताज्या घडामोडीMonsoon Alert: राज्यात आगामी ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता - IMD

Monsoon Alert: राज्यात आगामी ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता – IMD

Subscribe

१५ जून रोजी मुंबई,पालघर,ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस होईल.तर १६व १९ जून रोजी रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने सुरुवातीच्या काही दिवसातच जबरदस्त बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. राज्यात आजपासून पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता IMDकडून वर्तवण्यात आली आहे. (Chance of torrential rains in the next 4 days in Maharashtra – IMD) आजपासून पुढील ४ दिवस कोकण, गोवा,विदर्भातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई,ठाणे,रायगड जिल्ह्याला देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. मुंबईत १५ जून, १७ जून आणि १८ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासात ढगांच्या गडगडाटासह मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात जास्तीत जास्त ३१ डिग्री सेल्सिअस तापमान राहिल,तर कमीत कमी २५ डिग्री सेल्सिअस तापमान राहिल. तर पुढील ४८ तासात शहर आणि उपनगरात जास्तीत जास्त ३२ डिग्री सेल्सिअस तापमान राहिल,तर कमीत कमी २५ डिग्री सेल्सिअस तापमान राहिल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर कोकणात येत्या ४ दिवसात मुसळधार पाऊस होणार आहे. १५ जून रोजी मुंबई,पालघर,ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस होईल.तर १६व १९ जून रोजी रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १७ व १८ जून रोजी मुंबई,रायगड आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भात १५ जून रोजी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भात पुढील चार दिवस पाऊस नसेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -


दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पासून पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून तूफान पाऊस सुरु आहे. सिंधुदूर्गात मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे. आता आणखी चार दिवस सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्राचा विचार केला असता पुण्यात आज मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील चार दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आली आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात १५,१६ आणि १७ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे तीन दिवस सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर १८ आणि १९ जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – PDF स्वरुपात मुलांपर्यंत पुस्तके उपलब्ध करुन देणार – शिक्षणमंत्री

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -