घरमहाराष्ट्रChandigarh: महापौर पदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप असे करत असेल तर लोकसभेसाठी काय...

Chandigarh: महापौर पदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप असे करत असेल तर लोकसभेसाठी काय नाही करणार; आव्हाड बरसले

Subscribe

भाजपाने निवडणूक पीठासीन अधिकाऱ्याची मदत घेत, विरोधी उमेदवाराची मत बाद ठरवली, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

चंदीगड: चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. यात भाजपाचे उमेदवार मनोजकुमार सोनकर यांचा विजय झाला आहे. इंडिया आघाडीची ही पहिलीच निवडणूक होती. या पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. भाजपाच्या मनोजकुमार सोनकर यांनी आप-काँग्रेस संयुक्त उमेदवार कुलदीप सिंग यांचा पराभव केला. (Chandigarh If BJP is doing this to win mayoral polls what won t it do for Lok Sabha Challenges poured in)

चंदीगडच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर, विरोधकांनी भाजपावर आरोप केले आहेत. भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक पीठासीन अधिकाऱ्याची मदत घेतल्याचं विरोधकांनी म्हटलं. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत, भाजपाने लोकशाहीचा गळा आवळला असल्याचं म्हटलं आहे. भाजपाने निवडणूक पीठासीन अधिकाऱ्याची मदत घेत, विरोधी उमेदवाराची मत बाद ठरवली, असा आरोप आव्हाडांनी केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले आव्हाड?

आज गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशीच भाजपाने पुन्हा एकदा लोकशाहीची हत्या केली आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपाने लोकशाहीचा गळा आवळत काँग्रेस आणि आपची मते निवडणूक पिठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्या मदतीने बाद ठरवली.ज्यामुळे भाजपचा महापौर तिथे निवडून आला.हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाल्याने उघडकीस तरी आला. एवढी छोटी निवडणूक जिंकण्यासाठी जर भाजपा हे प्रकार करत असेल तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काय काय करत असतील याचा आता तुम्हीच विचार करा..! आता या देशात निष्पक्ष निवडणुकांची आशा मावळली आहे, असं म्हटल तर खोटं ठरणार नाही.

- Advertisement -

अशी पार पडली निवडणूक

महापालिकेचे उपायुक्त विनय प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत ही मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 10 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु, उपायुक्त आणि भाजपाचे काही नगरसेवक उशिरा आल्याने मतदान प्रक्रियेला सुरूवात होण्यास तासभर उशीर झाला.

खासदार किरण खेर सभाहाचे पदसिद्ध सद्य आहेत. त्यांनी प्रथम मत दिलं. त्यानंतर तासभार चाललेल्या या प्रक्रियेत एकूण 36 मते पडली. यापैकी आप आणि काँग्रेसला मिळून 20 मते मिळाली. तर, भाजपाला 15 मते मिळाली. तर, एक मत खेर यांच्याकडे होतं.

सुरुवातीला 18 जानेवारी रोजी होणारी निवडणूक पीठासीन अधिकारी आजारी पडल्याने 6 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या स्थगितीबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर, न्यायालयाने 30 जानेवारी रोजी मतदान घेण्याचे निर्देश दिले.

(हेही वाचा :Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौरपद निवडणुकीत ‘इंडिया’ला झटका; केजरीवाल भाजपवर संतापले)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -