घरमहाराष्ट्रचांडोळा तलाव मुस्लिमांनी पचवला; गुजरातमधील तरुणाची राज ठाकरेंना साद

चांडोळा तलाव मुस्लिमांनी पचवला; गुजरातमधील तरुणाची राज ठाकरेंना साद

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांनी गेल्यावर्षी मशिदीवरील भोंग्याचा विषय उचलून धरला होता. त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यातील अनेक भोंगे बंद झाले. त्यानंतर, यावर्षी त्यांनी माहिम खाडीवरील अनधिकृत बांधकामासंदर्भात माहिती दिली. आपल्या भाषणात या अनधिकृत बांधकामाविषयी ताशेरे ओढल्यानंतर १२ तासांच्या आत त्या बांधकामावर कारवाई करण्यात आली. राज ठाकरेंच्या या प्रभावी भाषणामुळे गुजरातमधील एक तरुण प्रभावित झाला आहे. त्यामुळे त्याने तेथील एका समस्येविषयी थेट महाराष्ट्रातील राज ठाकरेंना साद घातली आहे.

लिंकन सोखडिया असं या तरुणाचं नाव आहे. त्याने अहमदाबादच्या प्रसिद्ध चांडोळा तलावाविषयी राज ठाकरेंकडे तक्रार केली आहे. ‘अहमदाबाद’चा प्रसिद्ध चांडोळा तलाव आता नामशेष झाला आहे. इथला निम्मा तलाव बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी पचवला आहे. हे संपूर्ण गुजरातला माहीत आहे, असे या तरुणाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात आणि अनेक गुन्हेगार लपून बसले आहेत. इथे एक नाही तर अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत. आत्तापर्यंत गुजरातच्या एकाही नेत्याने तिरडी पाहिली नाही किंवा याबाबत आवाज उठवला नाही. निदान एक द्विट तरी करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या अज्ञानी हिंदूंचे भविष्य वाचेल.’ असं ट्वीट लिकंन सोखडिया या तरुणाने केलं आहे.

- Advertisement -


गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात भव्य जाहीर सभा घेतली. या सभेला लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. उपस्थित जनतेच्या मनात हिंदूत्वाविषयी स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न केला. तसंच, माहिम खाडीवरील अनधिकृत बांधकामाचा व्हिडिओच लोकांसमोर सादर केला. या व्हिडीओमध्ये माहिमच्या खाडीवर अनधिकृत मजार बांधण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. दोन वर्षांपूर्वी हे बांधकाम बांधण्यात आलं होतं. मनसेने हा मुद्दा उपस्थित करताच मध्यरात्रीच जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्यासाठी अध्यादेश दिले. दुसऱ्या दिवशी सकाळीच पालिकेचे अधिकारी, पोलिस घटनास्थळी दाखल होत बांधकामावर कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -