Homeमहाराष्ट्रChandrahar Patil : पंचांना गोळ्या घालण्याची भाषा करणारे चंद्रहार पाटलांचा मोठा निर्णय,...

Chandrahar Patil : पंचांना गोळ्या घालण्याची भाषा करणारे चंद्रहार पाटलांचा मोठा निर्णय, काय म्हणाले?

Subscribe

सांगली : नुकतेच पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पैलवान पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. पण यावेळी झालेल्या गदारोळाची सर्वाधिक चर्चा झाली. उपांत्य फेरीनंतर झालेल्या सर्व वादानंतर पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. पण या वादावरून अनेक प्रतिक्रिया आल्या. यावेळी पंचांनी दिलेल्या निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी थेट त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केली. अशामध्ये आता स्वतः चंद्रहार पाटील यांनी आपल्या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता हा वाद आता नवे वळण घेण्याची शक्यता आहे. (Chandrahar Patil double maharashtra kesari will return his gad in protest)

हेही वाचा : Mumbai BMC Budget : उत्पन्न वाढ करताना मुंबई पालिकेची प्रशासकीय खर्चात बचत 

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले की, “पंचांच्या निर्णयामुळे मला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पंच कमिटीने माझ्या पराभवाच्या कारणांची दखल घ्यावी, नाहीतर येत्या दोन दिवसांत मी माझ्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करेन,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. ते म्हणले की, “2007 मध्ये महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्या सांगली जिल्ह्याला जवळजवळ 28 वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. त्यानंतर 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मला आणि सांगली जिल्ह्याला मिळाला. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पहिला पैलवान मी होतो. त्यावेळी जसे शिवराज राक्षेवर अन्याय झाला तसेच माझ्यावरही अन्याय झाला होता. मलाही अशापद्धतीने हरवले होते.” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारण्यावरून पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असे म्हणत चंद्रहार पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता चंद्रहार पाटील म्हणाले की, “पैलवान पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो. त्यामध्ये पृथ्वीराजची काही चूक नाही. पण पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. मीसुद्धा 2009 मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो, त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो.” असा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला.