शिवसैनिकांना संघर्ष सुरुच ठेवायचा असल्यास भाजप सक्षम, चंद्रकांत दादांचा थेट शिवसेनेला इशारा

राज्यात हम करे सो कायदा अशी परिस्थिती सुरु

Chandrakant Patil slams thackeray government on obc reservation Imperical Data
"इम्पेरिकल डेटा" इंग्रजी शब्द असल्यामुळे फरक कळाला नसावा, चंद्रकांत पाटील यांचा टोला

भाजपच्यावतीने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा आयोजित करण्यात आला होता. परंतु या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झालं होतं. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. शिवसेना भवनासमोर राडा केल्यास खपवून घेतलं जाणार नाही असे शिवसेनेकडून म्हटलं आहे. तर शिवसेनेनं राडा केल्यास उत्तरासाठी भाजपही सक्षम असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आशा सेविकांच्या मुद्दयावर अधिवेशनात राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरणार असल्याचाही इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

भाजपच्या फटकरा मोर्चादरम्यान झालेल्या राड्यामुळे शिवसेना आणि भाजप आमनेसामने आलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, शिवसेना भवनासमोर आंदोलन केल्यास खपवून घेतलं जाणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, सत्तेत असल्यामुळे शिवसैनिक राडे करतील तर त्याचा परिणाम सर्वांना भोगावे लागतील. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवेसेच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याची जाणीव करुन दिली आहे. सत्तेत असल्यामुळे शांतता राखा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल असल्यामुळे हा विषय इथचं थांबायला हवा अशी भाजपचीही इच्छा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तसेच शिवसैनिकांना राडा करायचाच असेल तर भाजपही सक्षम असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

भाजपला फरक पडत नाही

भाजपची संघटनात्मक रचना बळकट आहे. त्यामुळे भाजपला राज्य सरकारच्या कोणत्याही रचनेचा फरक पडणार नाही. राज्य सरकारने महापालिकेची वॉर्ड रचना करताना मुंबई शहराच्या विकासाचा विचार करायला हवा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिवेशनाच गच्छंती अटळ

उपमुख्य अजित पवार यांनी आशा सेविकांच्या मागण्या ऐकूण घेतल्या नाहीत. आशा सेविकांना आंदोलन करावं लागलं याचा निषेध करत विधानसभा अधिवेशनात भाजप आशा सेविकांच्या प्रश्नांवर राज्य सरकारला घेरणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटात ज्या आशा सेविकांनी आपली सेवा दिली त्या आशा सेविकांच्या मागण्या अजित पवार यांनी गाडीत बसून ऐकायला पाहिजे होत्या परंतु अजित पवार यांनी तसं केलं नाही. कोणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर गुन्हे आणि लाठीचार्ज करण्यात येत आहेत. राज्यात हम करे सो कायदा अशी परिस्थिती सुरु असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.